आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकीटमार चोरट्याला जमावाकडून मिळाला बेदम चोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - येथील तहसील कार्यालयात गर्दीचा फायदा घेत पाकीटमारी करणाऱ्या चोरट्याला जमावाने रंगेहाथ पकडले. तसेच बेदम चोप देत तालुका पोलिस ठाण्यात आणले. दरम्यान, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडल्यामुळे चोरट्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात ग्रामपंचायत नविडणुकांचे अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होत आहे. तसेच शैक्षणिक दाखले मिळवण्यासाठीदेखील विद्यार्थी पालक तहसील कार्यालयात येतात. या गर्दीचा फायदा घेत हातसफाई करण्यासाठी आलेला एक पाकीटमार चोरटा सावजाच्या शोधात होता. रेकाॅर्ड शाखेच्या जवळ एकाच्या खिशातून पाकीट मारताना या चोरट्यास रंगेहाथ पकडण्यात आले.
या वेळी जमावाने चोरट्याची मनसोक्त धुलाई केली. त्यानंतर मारहाण करीत या चोरट्यास तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान, हा प्रकार शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे तालुका पोलिसांनी चोरट्याची रवानगी शहर पोलिस ठाण्याकडे केली. यासंदर्भात उशिरापर्यंत या पाकीटमाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

गर्दीच्या ठिकाणांचा फायदा
बसस्थानकासहरेल्वेस्थानकावर इतर गर्दीच्या ठिकाणी चोरटे धूम करतात. गेल्या आठवड्यात ग्रामपंचायत नविडणुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. तिथेही चोरट्यांनी हातसफाइ केली. त्यात महिला टोळीचाही समावेश आहे. बसस्थानक परिसर महाविद्यालयांच्या परिसरात खिसे कापण्याचे प्रकार घडतात. पोलिसांकडून मात्र अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवले जात नाही, असे चित्र दिसते.