जळगाव- तूर डाळीच्यादराने यंदा उच्चांकच गाठला अाहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक नियोजन काेलमडल्याची स्थिती आहे. तूरडाळीबरोबरच अन्य डाळी आणि तांदळाच्या दरातही वाढ होत आहे. पावसाअभावी या वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना घरातील मेन्यूमधून डाळच गायब होत असल्याची स्थिती आहे.
किरकोळ बाजारात दोन आठवड्यांपूर्वी प्रतिकिलो १२५ ते १३० रुपये दर असलेली तूरडाळ आता १४० ते १४५ रुपये झाली अाहे. पुरेशा पावसाअभावी उत्पादनाला फटका बसल्याने अागामी सणासुदीच्या काळात डाळींची दरवाढ किंवा साठेबाज कृत्रिम टंचाई करण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने पाच हजार टन डाळ आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्राने यापूर्वीही उडीद आणि तूर डाळीसाठी निविदा मागवल्या हाेत्या. तसेच वाटाणा अाणि मूग डाळीसाठीही िनविदा काढण्यात आल्या आहेत. तूर डाळ आयात केल्यास साठेबाजांवर दबाव येऊन दर घसरतील, असा शासनाचा अंदाज असल्याने त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली अाहे.
हवामानाचापरिणाम : प्रतिकूलहवामानामुळे यंदा खरीप हंगामावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यात केवळ कडधान्येच नाही, तर सोयाबीन, मका, कापूस, भात या पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तसेच मूग, उडीद, तूर या कडधान्यांच्या उत्पादनावरही परिणाम होऊ शकताे. म्यानमार (ब्रह्मदेश) टांझानियासह परदेशातून येणाऱ्या डाळीच्या दरातही वाढ झाली असून, आयातीवर मर्यादा आल्याने दरवाढीचा फटका सामान्य ग्राहकांना बसणार आहे. याशिवाय लातूरसह मराठवाड्यातही डाळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असते. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे.
केंद्राने अायात केल्यास दर स्थिर राहतील
^तूरडाळी१५० रुपयांपर्यंत पोहाेचल्याने डाळीच्या विक्रीतही घट झाली आहे. १५ िदवसांपासून दर वाढ होत आहे. तूरसह अन्य डाळींचे दरही वाढत असल्याने डाळींचे पदार्थ टाळण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. केंद्राने डाळ आयात केली तरच दर स्थिर राहतील. राजेंद्रसोनवणे, किराणा व्यावसायिक
एफसीआय, चिनोरमध्ये वाढ
डाळीच्यादरवाढीबरोबर तांदळाच्या दरातही १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. सामान्य ग्राहकांकडून वापरल्या जाणाऱ्या एफसीआय, सुगंधी चिनोर, कोलम या तांदळाच्या प्रकारात ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे डाळ-भाताचे जेवणही महागले आहे.
दर वाढण्याची शक्यता अधिक
^विदेशासह अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या डाळींचे प्रमाण घटल्याने तूर डाळीचे दर १५० रुपयांवर पोहाेचले आहेत. यंदा पाऊस नसल्याने ही स्थिती किमान काही महिने तरी राहणार अाहे. डाळींबरोबरच तांदळाच्या दरानेही भरारी घेतली आहे. त्यामुळे पुढील सणांवर महागाईचे सावट असणार आहे. - प्रवीणपगारिया, डाळविक्रेता
तूर १४०-१४५
मूग १००-१२०
उडीद ११५-१२०
चणा ६८-७०
मसूर ९०
तांदूळ २५ ते ३० (एफसीआय)
असे आहेत सध्या डाळींचे दर (प्रतिकिलो)