आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंप्राळा बाजारात शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील पिंप्राळा परिसरातील आठवडेबाजारात शेतकरी थेट शेतातून ताजा, स्वच्छ भाजीपाला विक्रीसाठी आणत असल्याने नागरिकांकडून या बाजाराला अधिक पसंती दिली जात आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातच थेट खेरेदी-विक्रीचा व्यवहार होत असल्याने शतकऱ्यांना दोन पैसे अधिक तर ग्राहकांनाही रास्त भावात भाजीपाला मिळतो. त्यामुळे ग्राहकांमध्ये या आठवडे बाजाराचे आकर्षण अधिक वाढले आहे.
पिंप्राळा परिसरात दर बुधवारी हा अाठवड्याचा बाजार भरला जाताे. यामध्ये जळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी माेठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीस आणतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दुपटीच्या नफ्यात अापला शेतमाल विकण्याची संधी मिळाली अाहे. ताजा, स्वच्छ अाणि अाठवडाभर टिकणारा भाजीपाला मिळत असल्याने शहरातील ग्राहकांकडून माेठी मागणी होत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या भाजीपाल्याची विक्री व्यापाऱ्यांकडे करता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढाकार घेतला अाहे. त्यामुळे या बाजारात शेतकरी माेठ्या प्रमाणात दिसून येतात. शहरात बळीरामपेठ, सुभाष चाैक, गाेलाणी मार्केट परिसरात बाजार भरताे. मात्र, विक्रेते हे व्यापाऱ्यांकडून हा माल घेत असल्याने शेतकऱ्यांना कमी नफा मिळताे अाणि ग्राहकांनाही पाच रुपयांपेक्षा अधिक पैसे माेजावे लागतात. म्हणून पिंप्राळ्याच्या बाजारात शेतकरी थेट स्वत: विक्रीसाठी पसंती देत अाहेत.

व्यापाऱ्यांकडे भाजीपाला पडून
अनेक शेतकरी अापला माल व्यापाऱ्यांकडे विक्री करतात. त्यांच्याकडून विक्रेते खरेदी करून बाजारात विकतात. मालाला उठाव नसल्यास अनेकदा व्यापाऱ्यांकडे तो पडून असताे. त्यामुळे हाच भाजीपाला दाेन ते तीन दिवसांनंतर विक्री केला जाताे. त्यावर पाणी मारून ताे भाजीपाला ताजा असल्याचे भासवले जाते.

महिलांकडून प्राधान्य
शेतकरी थेट ग्राहकाला विक्री करीत असल्याने ताजा स्वच्छ भाजीपाला मिळताे. त्यामुळे ग्राहकांचा याकडे अधिक अाेढा वाढला अाहे. तसेच चार ते पाच दिवस हा भाजीपाला चांगला राहताे. त्यामुळे ग्राहकांनाही घेणे परवडते. स्वच्छ, ताजा, टवटवीत भाजीपाला असल्याने प्रत्येक महिला या भाजी बाजाराला प्राधान्य देतात.

ग्राहकांना१५ ते २० टक्के फायदा
शेतकरीआपला भाजीपाला व्यापाऱ्याकडे मातीमाेल भावाने विक्री करतात. मात्र, स्वत:च भाजीपाला विकला, तर चांगला नफा यातून मिळतो. तसेच शेतकरी अधिक नफेखोरी करताना रास्त भावात विक्री करतात. त्यामुळे शेतकरी अाणि भाजीविक्रेत्यांच्या तुलनेत जवळपास १५ ते २० टक्के फायदा होत आहे.

ताजा भाजीपाला देतो
^स्वत:च मालविक्री केल्यास या ठिकाणी कधीही फायदाच हाेताे. ताजा माल असल्याने लाेकांची मागणी चांगली असते. ताजा भाजीपाला ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करीत असताे. ज्ञानेश्वर पाटील, अनाेरा

^दुपटीचा भावमिळताे. जेथे पाच रुपये कमवले असते, तिथे १० रुपये कमाई हाेते. ताजा भाजीपाला असल्याने प्रत्येक जण खरेदी करतात. एक क्विंटल माल विक्री करताे. विनाेद लाेणारे, एरंडाेल

^माल अामचाअसताे. त्यामुळे माल विकताना ताे गेला किंवा राहिला तरी काही फरक पडत नाही. कारण त्या भाजीपाल्यातून फायदाच असताे. जास्त दिवस माल पडून राहत नाही. मगनबाई , एरंडाेल

ताजा भाजीपाला मिळतो
^पिंप्राळा अाणि परिसरातील लाेकांना हा बाजार जवळ पडताे. भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून मिळत असल्याने तो ताजा असताे. सहा वर्षांपासून भाजीपाला घेते अाहे. संगीता गिरनारे, ग्राहक

^गुणवत्ता चांगलीअसते. गावात जायलाही खूप दूर पडत असल्याने हा बाजार साेईस्कर अाहे. किलाे मागे पाच रुपयांचा तरी फरक जाणवताे. इथे कमी भावात मिळताे. अरुणा पाटील, ग्राहक

^या ठिकाणी स्वस्त भाजीपाला मिळताे. ताे ताजा अाणि स्वच्छ असताे. थेट शेतकऱ्यांकडून मिळत असल्याने चांगला असताे. - उषा साेनवणे, ग्राहक

^हा बाजार विक्रेत्यांना नेहमीच परवडताे. इथे लगेच पैसे मिळून जातात. - चंद्रकांत बारी, जळगाव