आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावसह राज्यातील 3 जिल्ह्यांचा कृती आराखडा, मानव निर्देशांक उंचावणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत ‘न्यू इंडिया’ बनवण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी येत्या पाच वर्षांत देशातील सर्वाधिक मागास ११५ जिल्ह्यांचा मानव निर्देशांक उंचावण्याच्या दृष्टीने ‘जिल्हा कृती आराखडा’ तयार केला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यांमध्ये जळगाव, नंदुरबार नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. 

 

भारतातील ११५ जिल्ह्यांमध्ये पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य आणि रस्ते या मूलभूत सुविधांचा अभाव दिसून आला आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत रोजगारावर भर, रस्त्यांची सुविधा, शैक्षणिक, आरोग्याच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जाणार असून प्राधान्याने ह्या समस्या सोडवण्यावर भर असेल. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन नागरिकांना कुठल्या अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी केंद्रीय मंत्रालयात नियुक्त असलेल्या अतिरिक्त आणि संयुक्त सचिवस्तरावरील आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात जळगाव जिल्ह्यासाठी माहिती प्रसारण मंत्रालयातील माहिती सचिव जयश्री मुखर्जी यांची नियुक्ती केली आहे. लवकरच त्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्याविषयी गोपनीयता पाळण्याचे केंद्रस्तरावरून संबंधिताना आदेशित केले आहे. 

 

देशातील ११५ जिल्ह्यांचा अॅक्शन प्लॅनमध्ये समावेश 
झारखंड१९, बिहार १३, छत्तीसगढ १०, मध्य प्रदेश ८, उत्तर प्रदेश ८, राजस्थान ५, प. बंगाल ५, ओडिशा ८, अासाम ७, आंध्र प्रदेश ५, महाराष्ट्र, ३, तेलंगणा ३, गुजरात २, पंजाब असे देशातील ११५ जिल्ह्यांचा अॅक्शन प्लॅनमध्ये समावेश केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...