आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुक्र ग्रह करणार आज सूर्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: शुक्र ग्रह बुधवारी (दि. 6 जून) सूर्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’ करणार आहे. भारतात सूर्योदयावेळी म्हणजे सकाळी 6 वाजेपासून 10.20 पर्यंत हे अधिक्रमण दिसणार असून, एका शतकात केवळ दोनदा घडणारी ही अनोखी खगोलशास्त्रीय घटना आहे.
खगोलशास्त्राचे अभ्यासक अनिल दंडगव्हाळ व सचिन मालेगावकर यांनी याविषयी सांगितले, की कोपर्निकस, केपलर, गॅलिलिओ आणि न्यूटन यांच्यासारख्या शास्त्रज्ञांना त्यांच्या जीवनात हे अधिक्रमण पाहायला मिळाले नाही. तो योग आला असून, या शतकातील अखेरचे अधिक्रमण अनुभवण्याचे भाग्य लाभल्याने ही संधी कोणत्याही नागरिकाने सोडू नये.
संक्रमण सुरक्षित चष्म्याशिवाय पाहणे ठरू शकते धोकादायक
शुक्राचे अधिक्रमण ही दुर्मिळ खगोलीय घटना आहे. खगोल प्रेमी शिक्षक व विद्यार्थ्यांनी या वैज्ञानिक अनुभूतीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक्रमण साध्या डोळ्यांनी पाहू नये त्यासाठी दुर्बीण, बायनोक्युलर किंवा पिन हॉल कॅमेरा यांच्या साहाय्यानेच हे अधिक्रमण पाहावे. असे आवाहन सर्व माध्यमिक व उच्च् माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.
संक्रमण पाहण्यास तीन दुर्बिण
शुक्राचे संक्रमण पाहण्याची सोय शिरसोली रस्त्यावरील सेंट टेरेसा शाळे जवळ केली आहे. यासाठी तीन दुर्बिण, प्रोजेक्टरची सोय उपलब्ध असल्याचे खगोल अभ्यासक सतीश पाटील यांनी कळविले आहे.
अधिक्रमण पाहताना
अधिक्रमण कुणीही थेटपणे साध्या डोळ्यांनी किंवा साध्या दुर्बिणीद्वारे पाहू नये. छोट्या आरशावर सूर्याचे प्रतिबिंब घेऊन त्याची प्रतिमा पांढर्‍या रंगाच्या भिंतीवर किंवा कागदावर परावर्तित करून त्यातून होणारे शुक्राचे अधिक्रमण बघावे. फार तर सौर फिल्टर लावलेले चष्मे किंवा विशेष प्रकारचे फिल्टर लावलेल्या दुर्बिणीतून ते पाहावे.
जळगावमध्ये या वेळी..
जळगाव शहरात 6 जून रोजी सूर्योदय 5 वाजून 46 मिटाने होणार आहे. शुक्राचे संक्रमण 6 वाजून 30 मिनिटांनी दिसेल. शेवट 10 वाजून 15 मिनीटने होणार आहे. असल्याची माहिती खगोलशास्त्र अभ्यासकांनी दिली.