आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमअायडीसीत वृक्षाराेपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - एमआयडीसीमध्येसन १९९१ ते १९९७च्या काळात भूसंपादन होऊन भूखंडांचे वाटप करण्यास सुरुवात झाली. मात्र, तब्बल १५ ते १७ वर्षांचा काळ उलटूनही प्रशासनाने या भागात वृक्षारोपण करण्याचा साधा प्रयत्नही केलेला नाही. सध्या एमआयडीसीमध्ये ३० उद्योग कार्यरत असून, त्यातही बोटावर मोजण्याइतक्याच उद्योजकांनी आपल्या भूखंडावर वृक्षलागवड केली आहे.
गेल्या २० वर्षांपासून संपादित झालेल्या तब्बल ६०० हेक्टर जागा पडून आहेत. सध्या भुसावळ एमआयडीसीला उद्योजकांकडून पसंती मिळत असल्याने वर्षभरात अनेक उद्योग सुरू होतील. परिणामी, दोन वर्षांत ध्वनी आणि वायुप्रदूषणाची नवी समस्या डोके वर काढणार आहे. या समस्यांवर आडगा काढण्यासाठी आता ऊपज, ग्रीन अर्थ फाउंडेशन, आई फाउंडेशन, शक्ती फाउंडेशन, संस्कृती फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ रेल सिटी या संस्थांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील इतरही स्वयंसेवी संस्था, संघटना, सार्वजनकि गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव मंडळांचे सहकार्य घेऊन वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यासाठी आठवडाभरात नियोजन आराखडा तयार करून जुलैत वृक्षाराेपण होणार आ.
- शहरातही गेल्या दोन वर्षांपासून पालकिेने वृक्षाराेपण केलेले नाही. किमान यंदा तरी पावसाळा नजरेसमाेर ठेवून खुले भूखंड, शहरानजीकच्या तापी नदीकाठावरील टेकड्या, जुगादेवी परिसर, क्रीडा संकुल परिसर आदी भागात वृक्षाराेपण करण्यावर पालकिेने भर दिला पाहिजे.
- एमआयडीसीत उद्योजक बोअरवेल करू शकत नाहीत. मात्र, अनेकांनी नियमबाह्य बोअरवेल करून पाण्याचा उपसा सुरू केला आहे. भूगर्भातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. वृक्षाराेपण,
रेन वॉटर हार्वेस्टिंग, साठवण बंधारे आदी प्रयोग करून भू-जलपातळी वाढवता येऊ शकते.
एमआयडीसीमध्ये अनेक उद्योजकांनी आपल्या भूखंडावर वृक्षारोपणाचे प्रयत्न केले आहेत. मात्र, योग्य पद्धतीने संगोपन झाल्याने हा प्रयोग फसला. आता स्वयंसेवी संस्थांनाही मदत करून ग्रीन बेल्ट होण्यासाठी प्रयत्न केले जातील. अनिरुद्धओक, उद्योजक, एमआयडीसी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीला इतर संस्थांनीही पुढे यावे. श्रमदानातून एमआयडीसी हिरवीगार करण्याचा मानस आ. त्यातून आगामी काळात प्रदूषणाला आळा बसवता येेईल. रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षाराेपण करण्यावर भर दिला जाईल. रणजितसिंगराजपूत, अध्यक्ष, संस्कृती फाउंडेशन
एमआयडीसी प्रशासन वृक्षारोपण करत नसले तरी, ही जबाबदारी प्रत्येक उद्योजकाने स्वीकारायला हवी. प्रत्येकाने आपल्या भूखंडाच्या चहुबाजूंना वृक्षारोपण केल्यास ग्रीन बेल्ट तयार होईल. सुरेंद्रचौधरी, सचवि, ऊपज संस्था
वृक्षारोपण ही एक चळवळ व्हावी. स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणानंतर प्रत्येक झाड दत्तक घेऊन संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी. विजयजावळे, सचवि, शक्ती फाउंडेशन
सामाजकि संस्था काय म्हणतात?
दाहकता होईल कमी
एमआयडीसीलायेत्या दोन ते तीन वर्षांत सुगीचे दविस येणार आहेत. अनेक उद्योग व्यवसाय उभारले जात आहेत. काही नवीन उद्योगही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होईल. त्यापूर्वीच व्यापक प्रमाणात वृक्षारोपण केल्यास प्रदूषणाची दाहकता कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच तापमानही नियंत्रणात येऊ शकते.
रेन वाॅटर हार्वेस्टिंग, साठवण बंधारे गरजेचे
शहरातील खडका, किन्ही आणि शविपूर-कन्हाळे या तीन गावांच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्र औद्योगकि वकिास महामंडळाच्या जागेवर गेल्या १५ वर्षांपासून वृक्षलागवड झालेली नाही. सध्या एमआयडीसीमध्ये उद्योगांची संख्या वाढत असल्याने दोन-तीन वर्षांत प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होऊ शकतोे. शासकीय पातळीवर वृक्षलागवड करण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने
साधारणत: जुलै महिन्यात स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वृक्षारोपण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...