आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात यंदा 73 लाख 13 हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्ह्यात शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत या वर्षी शासकीय यंत्रणेला 73 लाख 13 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, वृक्षारोपणासाठी वनविभागाकडे 16 लाख रोपे तयार आहेत. जळगाव विभागाच्या रोपवाटिकेत आठ लाख, तर तेवढीच रोपे यावल विभागातही तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, गतवर्षी केलेल्या वृक्षारोपणातील 70 टक्के रोपे जगवण्यात वनविभाग यशस्वी ठरला आहे.
शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत यंदा जवळपास 36 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेला देण्यात आले असून, उर्वरित झाडे जिल्ह्यातील इतर शासकीय यंत्रणांकडून लावली जाणार आहेत. जिल्हा परिषदेला देण्यात आलेल्या उद्दिष्टात संबंधित ग्रामपंचायतींनी स्वत: रोपवाटिका तयार करून वृक्षलागवड करणे अपेक्षित आहे. तसेच इतर विभागांनादेखील स्वत:ची रोपवाटिका तयार करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाने रोपवाटिका तयार केल्या आहेत.
जळगाव विभागाकडे 8 लाख रोपे
जळगाव वनविभागात 14 रोपवाटिका असून, त्यात सर्व मिळून एकूण आठ लाख रोपे तयार आहेत. जळगाव शहरातील उपवनसंरक्षकांच्या निवासस्थानी असलेल्या रोपवाटिकेत सुमारे एक लाख रोपे तयार करण्यात आली आहेत.
महापालिकेकडे 2 हजार रोपे
जळगाव शहरात वृक्षारोपण करण्यासाठी महापालिकेकडे दोन हजार रोपे उपलब्ध आहेत. महापालिका प्रशासनाने शहरातील चारही प्रभागांमध्ये रोपवाटिका तयार केल्या आहे. या ठिकाणाहून नागरिकांना ही रोपे वितरित केली जाणार आहेत. तरी नागरिकांनी तेथून रोपे घेऊन जावी.