आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टीक बॅगमुक्तीसाठी वरद विनायक ग्रुपच्या ऊर्मिला खाचणेंचा लढा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- प्लास्टीक कॅरीबॅगमुक्तीसाठी शहरातील श्री वरद विनायक ग्रुपच्या ऊर्मिला खाचणे(चौधरी) यांनी गेल्या वर्षापासून व्यापक उपक्रम हाती घेतला आहे. 3 जुलै 2012 पासून आजतागायत त्यांनी साडेतीन हजार विद्यार्थी आणि दीड हजार महिलांना प्लास्टीक पिशव्यांना पर्याय म्हणून घरच्या घरीच तयार होणार्‍या कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. स्वत: 1600 कागदी बॅगचे ठिकठिकाणी वाटप केले.

बाजारात भाजीपाला खरेदीपासून चहाच्या ग्लासपर्यंतचे विश्व प्लास्टीकने व्यापले आहे. यामुळे प्रदूषण वाढ, गुराढोरांना अपाय होतो. प्लास्टीक कचरा नाल्यांमध्ये अडकून वाहते पाणी थांबते. यावर प्रबोधनासाठी खाचणे यांनी वर्षभर काम केले. खाचणे हॉलमध्ये 3 जुलै 2012 रोजी शहरातील 17 शाळांमधील 800 विद्यार्थ्यांना तीन प्रकारच्या प्लास्टीक बॅग तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. यातून तयार झालेल्या 1600 बॅग बाजारात वाटल्या. कार्यक्रम, समारंभाला उपस्थिती देताना खाचणे कागदी पिशव्यांचे गिफ्ट आवर्जून देतात.

असे राबवले उपक्रम
जामनेर नगरपरिषदेच्या महिला बचत गटांना कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव चौधरी वाचनालयाच्या माध्यमातून सुट्यांमध्ये शिबिर घेऊन प्लास्टिकला पर्याय म्हणून कागदी पिशव्यांचे महत्त्व पटवून दिले. भारतीय बालकल्याण परिषदने घेतलेल्या चित्रकला स्पर्धांमध्ये सहभागी मुलांना कागदी पिशव्यांच्या उपयोगाची माहिती दिली. यामुळे खाचणे यांना एकाच वेळी 9 हजार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचता आले.

10 लाख वर्षांत विघटन
प्लास्टीक कॅरीबॅगचे विघटन होण्यासाठी 10 लाख वर्ष लागतात. या तुलनेत कागदी बॅग केवळ एका महिन्यात, तर केळी खोडापासून तयार केलेल्या बॅगेचे तीन आठवड्यात विघटन होते.
-ऊर्मिला खाचणे, संचालक, श्री वरद विनायक ग्रुप, भुसावळ