जळगाव - प्लास्टिक पिशव्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असतो. त्याचे भविष्यातील पडसाद टाळण्यासाठी शहरातील मोठ्या व्यावसायिकांनी वर्षानुवर्षे वापरण्यात येत असलेल्या प्लास्टिकला हद्दपार करत कापडी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. त्यात आर.सी.बाफना ज्वेलर्सने आघाडी घेतली असून, इतरांनी जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘
आपलाच मोठेपणा, कॅरीबॅगला नको म्हणा’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘दिव्य मराठी’ने शहरात प्लास्टिक पिशव्या चहा कप वापराला आळा घालण्यासाठी मोहीम राबवली आहे. त्यामुळे अनेकांनी चहा पाण्याचे प्लास्टिकचे कप वापरणे टाळले आहे. ग्राहकदेखील घरूनच कापडी पिशवी सोबत नेऊ लागले आहेत. लहान किरकोळ विक्रेत्यांपासून सुरू झालेल्या प्लास्टिकमुक्तीच्या या मोहिमेत आता मोठ्या व्यावसायिकांनीही हातभार लावला आहे. त्यात पहिले पाऊल उचलले ते रतनलाल सी.बाफना यांनी. त्यांनी त्यांच्या सोने-चांदीच्या शोरूममध्ये ग्राहकांना देण्यात येणार्या प्लास्टिकच्या पिशव्या हद्दपार केल्या असून, कापडी पिशव्या द्यायला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे महावीर ज्वेलर्स एस-थ्री शोरूमच्या संचालकांनीही जून-जुलैपासून कापडी पिशव्या देण्याचा निर्धार केला आहे.
आम्हीही वापरणार कापडी पिशव्या
जूनपासून आम्ही देखील कापडी पिशव्यांचा वापर करणार आहाेत. महिन्याला आम्हाला सुमारे हजारांपर्यंत िपशव्यांची गरज भासते. - अजय ललवाणी, संचालक, महावीर ज्वेलर्स
लाख पिशव्यांचा वापर थांबला
बाफनाज्वेलर्सकडे गेल्या २५ वर्षांपासून प्लास्टिक िपशव्यांचा वापर सुरू हाेता. वर्षाकाठी ते लाख िपशव्यांची छपाई करत. प्लास्टिक पिशव्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास हाेताे. त्यामुळे रतनलाल सी.बाफना यांनी प्लास्टिकएेवजी कापडी पिशव्यांचा पर्याय निवडला. कापडी पिशवी महागडी असली तरी, त्यांचाच वापर यापुढेही करण्यात येणार आहे. आतापर्यंत लाख कापडी पिशव्या तयार केल्याचे मनाेहर पाटील यांनी सांगितले.
जूनमध्ये १०० % अंमलबजावणी
आमच्या दुकानात गेल्या काही महिन्यांपासून ५० टक्के कापडी ५० टक्के प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतोय. जून जुलै महिन्यापासून १०० टक्के कापडी पिशव्या ग्राहकांना दिल्या जातील. राकेशहासवानी, संचालक, एस-थ्री कलेक्शन
कापडी पिशव्यांना प्राधान्य
गेल्या काही वर्षांत ग्राहकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला होता. त्यामुळे कापडी पिशव्यांचा पर्याय निवडला. वर्षभरासाठी मोठ्या आकाराच्या अडीच हजार पिशव्या तयार करून घेतल्या आहेत. मोठी खरेदी करणार्या ग्राहकांना कापडी पिशवी दिली जाते. सुभाष कांकरिया, संचालक, शुभम् प्रोव्हिजन