आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणातील पाण्याचे बाष्पीभवन नियंत्रित करून वीजनिर्मिती करणारी सोलर प्लेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव: बांभोरीयेथील एसएसबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील मॅकेनिकलच्या विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण संशोधनात पाण्यावर तरंगणारे सोलर प्लेट तयार केले आहेत. या प्लेटमुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन वीजनिर्मिती होण्यास पुरेपूर मदत होणार आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण उमवितर्फे नुकतेच्या झालेल्या अविष्कार स्पर्धेत करण्यात आले. 
दुष्काळी स्थिती प्रखर उष्णतेमुळे धरणातील पाण्याचे मोठ्याप्रमाणात बाष्पीभवन होऊन पाणीसाठा कमी होतो. यामुळे नागरी भागाला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात मोठी कपात होते. हे लक्षात घेऊन एसएसबीटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तरंगणाऱ्या सोलर प्लेटचा प्रकल्प तयार केला आहे.
 या प्रकल्पातून पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासोबतच वीजनिर्मिती होण्यासही मदत होणार आहे. यामुळे या प्रकल्पाची बहुपयोगीता भविष्यात उपयोगी ठरणारी आहे. एसएसबीटी महाविद्यालयाच्या पंकज श्रीराम ठाकरे, शुभम दिलीप काशीकर, हिमांशू सुनील लढ्ढा, वरुण नयन सुरवाडे, अमोल सुधीर साळुंखे या विद्यार्थ्यांनी हा प्रयोग तयार केला आहे. त्यांना महेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.पाण्यातील जीवजंतूंवर परिणाम नाही. 

याउपकरणात प्रत्येक सोलर प्लेटमध्ये अंतर असल्यामुळे आणि त्याची जोडणी-मांडणी वेगवेगळी आहे. त्यामुळे पुरेसा सूर्यप्रकाश पाण्याच्या खालच्या भागात पोहोचेल. तर पाण्याखाली राहणारे जीव - जंतूंवरही या उपकरणाचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. या उपकरणाच्या विशिष्ट मांडणीमुळे पुराच्या वेळेस या उपकरणाला कमी वेळात काढता येऊ शकेल. यामुळे उपकरणाचे नुकसान होणार नाही.