आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Played In Gun Fear ; Petrol Pump Gourmet Martingale

खेळण्यातील बंदुकीचा धाक; पेट्रोलपंप लुटणारे जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव खेळण्यातील बंदुकीचा धाक; पेट्रोलपंप लुटणारे जेरबंद. या दोघांनी खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंप लुटण्याचा प्रयत्न केल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले आहे. आराध्या पेट्रोल पंपावर २० सप्टेंबर रोजी विनाक्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या दोघा तरुणांनी १०० रुपयांचे पेट्रोल टाकले. दरम्यान, विशाल राजेंद्र महाजन हा कर्मचारी पेट्रोल टाकत असताना दुचाकीवर मागे बसलेला तरुणाने खाली उतरून विशालला पिस्तूलचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील पैशांची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आरडाओरड केल्याने पंपावरील इतर कर्मचारी जागे झाले. तसेच सुरक्षारक्षकाने पळत येऊन लुटारूंच्या दिशेने काठी मारून फेकली.
त्यामुळे घाबरून दोघा लुटारूंनी दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकी घसरल्याने ती तेथेच टाकून ते जळगावच्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार वर्षांपूर्वी खेडी कढोली गावातील एका टोळीने अशाच पद्धतीने पेट्रोलपंप लुटल्याची घटना घडली होती. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी बापुराव भोसले, रवींद्र घुगे, राजेंद्र पाटील, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, विनयकुमार देसले यांचे पथक तपासासाठी पाठवले. त्यानुसार त्यांनी सापळा रचला. मात्र, संशयित टोळी गावात नसल्याची माहिती मिळाली. १९ सप्टेंबर राजी रात्री १२ वाजता गोपाळ वासुदेव सपकाळे, विजय कडू सोनवणे हे दोघे विनाक्रमांकाची मोटारसायकल घेऊन आल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी पाळत ठेऊन दोघांना गुरुवारी रात्री ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्यांनी पेट्रोलपंप लुटण्याचा प्रयत्न केल्याचे कबुल केले आहे. लूट करण्यासाठी वापरलेले प्लास्टिकची बंदूकही पोलिसांनी जप्त केली आहे. गोपाळवर यापूर्वी एरंडोल पोलिस ठाण्यात चार वर्षांपूर्वी मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे. तर गोकुळने हे पिस्तूल पद्मालय येथील यात्रेतून आपल्या मुलाच्या खेळण्यासाठी घेतले होते.

वाळूच्या डंपरवर गोपाळ चालक आहे; तर विजय हा जैनाबाद येथील वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर चालक आहे. ते यावलकडे नेहमी वाळू घेण्यासाठी जात होते. त्यामुळे त्यांनी यावलजवळ असलेला पेट्रोलपंप लुटून पाळधीजवळील तीन ते चार पेट्रोलपंप लुटण्याचा कट रचला.
१९ सप्टेंबर रोजी दोघे बसने यावलला गेले. गावाच्या बाहेर असलेल्या ढाब्यावर जेवण करून त्यांनी सुनील बोरसे (रा.अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर) यांच्या मालकीची मोटारसायकल चोरून यावलच्या पेट्रोल पंपाजवळ आले. मात्र, त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त असल्याचे बघून लुटीचा कट रद्द केला. त्यामुळे खेडी कढोलीला जाऊन पहाटे पाळधीजवळील पेट्रोलपंप लुटण्याचे ठरवले. त्याप्रमाणे ते घरी गेले. २० सप्टेंबर राजी पहाटे त्यांनी बांभोरी गावाजवळील आणि गोविंदा हॉटेलच्या बाजूला असलेल्या पेट्रोलपंपाची रेकी केली. मात्र, दोन्ही पेट्रोल पंपांवर गर्दी असल्याने पुन्हा त्यांचा कट फसला. त्यानंतर ते पुढे मातोश्री ढाब्याजवळील पेट्रोलपंपाजवळ आले. मात्र, तो बंद असल्याने त्यांनी पाळधीजवळ असलेल्या आराध्या पेट्रोल पंपाकडे मोर्चा वळवला. त्या पंपावर एकच कर्मचारी त्यांना दिसल्याने त्यांनी पेट्रोलपंप लुटण्याचा प्रयत्न केला.