आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडूंनी काेणतेही अनावश्यक प्राेटीन सप्लिमेंट घेणे टाळावे, डाॅ. अमाेल पाटील यांचा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जैन स्पाेर्ट्स अकॅडमीतर्फेर आयोजित कार्यशाळेत ‘अाहार, प्रथमाेपचार डाेपिंग अॅण्ड सप्लिमेंट’ या विषयावर मार्गदर्शन करताना डाॅ. अमाेल पाटील तर दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित खेळाडू. - Divya Marathi
जैन स्पाेर्ट्स अकॅडमीतर्फेर आयोजित कार्यशाळेत ‘अाहार, प्रथमाेपचार डाेपिंग अॅण्ड सप्लिमेंट’ या विषयावर मार्गदर्शन करताना डाॅ. अमाेल पाटील तर दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित खेळाडू.
जळगाव- अनेकदा व्यायाम करताना उत्तम शरीरयष्टी बनवण्यासाठी खेळाडूंतर्फे प्राेटीन सप्लिमेंट घेतले जाते. जीममध्ये अनेक प्रशिक्षक हे घेण्याचाही सल्ला देतात. पण सरसकट प्राेटीन घेऊ नये. ज्यांच्या शरीरात जन्मत:च काही त्रुटी अाहेत अशांनाच हे घ्यावे लागते. अापल्या खेळाच्या प्रशिक्षकांवर विश्वास ठेवून मगच निर्णय घ्यावा, असा सल्ला भारतीय महिला बाॅक्सिंग संघाचे फिजीशियन अस्थिराेगतज्ज्ञ डाॅ. अमाेल पाटील यांनी दिला. 
 
जैन स्पाेर्ट्स अकॅडमीतर्फे गुरुवारी सकाळी ते दुपारी १२ वाजेदरम्यान कांताई सभागृहात खेळाडूंसाठी माेफत वैद्यकीय कार्यशाळा झाली. यात ‘अाहार, प्रथमाेपचार डाेपिंग अॅण्ड सप्लिमेंट’ या विषयावर डाॅ. अमाेल पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मुला मुलींना खेळाकडे वळवा, खेळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे करिअर असल्याचे सांगितले. गुडघे प्रत्याराेपण तज्ज्ञ डाॅ. मनीष चाैधरी ‘शालेय जीवनात खेळाडूंपुढे हाेणाऱ्या दुखापतीची निगा कशी राखावी,’ याविषयावर मार्गदर्शन केले. यात त्यांनी खेळाडूंनी खास करून लहान शालेय विद्यार्थ्यांनी खेळताना बूट याेग्य प्रकारचे वापरावे, त्याचबराेबर सातत्य ठेवण्याचेही अावाहन केले. या वेळी अकॅडमीचे समन्वयक फारुख शेख, अरविंद देशपांडे, प्रा.डाॅ. अनिता काेल्हे, प्रशिक्षक सय्यद माेहसीन, प्रवीण ठाकरे, रवींद्र धर्माधिकारी, अजित घारगे, राष्ट्रीय अांतरराष्ट्रीय खेळाडू, पालकांची उपस्थिती हाेती. 
 
डाॅ. पाटील यांनी या दिल्या टिप्स 
-खेळाडू एखाद्या विशिष्ट वजनी गटात खेळताना वजनाबाबत सतर्क असताे; पण काही कारणास्तव वजन वाढल्यास ते लगेचच कमी देखील करतात. त्यामुळे एकदम सरळ वजन कमी वाढवू नये. याेग्य अाहाराप्रमाणे तेवढा कालावधी देऊन ते करावे. शरीरात लगेच बदल केल्यास तेवढा कालावधी दिला तर त्याचा उलट परिणाम हाेत असताे. त्यामुळे शरीरातील स्टेट हार्माेन वाढताे. परिणामी बीपी, डायबिटीससारखे अाजार हाेण्याची शक्यता त्याबराेबर झाेप देखील कमी हाेते. 
 
- खेळाबाबत काेणतीही नवीन प्रक्रिया ही स्पर्धेच्या अाधी करू नये, त्याची पूर्णपणे माहिती घेऊन किमान स्पर्धेच्या सहा अाठवड्यांच्या पूर्वी जे काही नियाेजन अाहे ते अवलंबवावे. जर सहा अाठवड्यांमध्ये ते केल्यास तुमच्या खेळावर त्याचा विपरीत परिणाम हाेण्याची शक्यता असते. तर शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी धावणे झाल्यानंतर याेग्य प्रमाणात पाणी प्यावे, ग्लुकाॅन डी घ्यावे, व्यवस्थित अाहार, अाठ तास झाेप घ्यावी. 
 
- रिकव्हरी ड्रिंक घेताना लिंबू-पाणी यासह, काेणतेही ग्लास ज्युस घ्यावे, मिल्कशेक घेऊ नये, ग्लुकाॅन डी चालते पण तेही मळमळ हाेणार नाही म्हणून हलक्या फ्लेवरचे प्यावे. यात स्ट्राँग फ्लेवर शक्यताे घेऊ नये. पुरुष खेळाडूने ५००० किलाे कॅलरीज तर महिला खेळाडूने ४५०० किलाे कॅलरीज, प्रशिक्षकास ३००० ते ३२०० किलाे कॅलरीज अावश्यक अाहे. खेळाडूच्या शरीरयष्टीला बघून यात कमी जास्त कॅलरीज करता येते. तसेच सुमारे १० ते १५ मिनिटे हे कुल डाऊन करावे. 
 
- प्रथमाेपचारासाठी अावश्यकबाबी साेबतच खेळाडूंनी अापल्या साेबत अाईस बॅग ठेवणे अावश्यक अाहे. खेळताना काेणत्याही दुखापतीला ७२ तासांपर्यंत दर दाेन तासांनी १० मिनिटे बर्फाने ती जागा शेकणे अावश्यक अाहे. खेळताना खेळाडूला जर दुखापत झाली तर त्यास काेणत्या पद्धतीने उचलावे, कसे उचलावे, मान पाठीच्या कणाची कशी निगा राखावी, याबाबतचे धडे देखील कार्यशाळेत देण्यात अाले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...