आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाॅटरी गल्लीत सटाेडे अटकेत, 1 लाख 24 हजार 640 रुपयांचा एेवज हस्तगत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लाॅटरी गल्लीत उपविभागीय अधिकाऱ्यांचे पथक अाणि शहर पाेलिसांच्या पथकाने पत्ते खेळणाऱ्यांवर साेमवारी सायंकाळी 5.30 वाजता कारवाई केली. यात सटाेड्यांना अटक करून त्यांच्याकडून 1 लाख 24 हजार 640 रुपयांचा एेवज हस्तगत केला अाहे.

जुन्या बसस्थानकाच्या मागच्या बाजूला काही तरुण पत्ते खेळत असल्याची माहिती उपविभागीय पाेलिस अधिकारी सचिन सांगळे यांना मिळाली हाेती. त्यावरून त्यांनी अनिल पाटील, संदीप पाटील तसेच शहर पाेलिस ठाण्याचे विजयसिंग पाटील, प्रितम पाटील यांना कारवाईसाठी पाठवले. त्यांनी गाेपाळ नवाल वाणी (वय २५, रा. शिवाजीनगर), श्याम संताेष चव्हाण (वय २५, रा. कुसुंबा), किरण गणेश साेनवणे (वय ३६, रा. कांचननगर), गजानन समाधान हटकर (रा. तांबापुरा) हे लाॅटरी गल्लीत पत्ते खेळत असताना अाढळले. त्यांना अटक करून त्यांच्याकडून १९ हजार ६४० रुपये राेख अाणि तीन दुचाकी असा एकूण लाख २४ हजार ६४० रुपयांचा एेवज हस्तगत केला. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात गुन्ह्याची नाेंद करण्यात अाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...