आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळेधारक भाडे द्यायला तयार, पण पालिकेची ना!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गाळेधारक कर देत नाहीत, या पालिकेच्या अाराेपात तथ्य नसून गेल्या चार वर्षांपासून प्रत्येकाने मागील भाड्यात १० टक्के वाढ करून दरवर्षी मनपाला धनादेश पाठवला. परंतु मनपा दरवर्षी धनादेश गाळेधारकांकडे परत पाठवत हाेता. गाळेधारकांनी नेहमीच याेग्य भाडेवाढ कर भरण्याची नेहमीच तयारी हाेती अाहे अशी भूमिका महानगरपालिका व्यापारी संकुल गाळेधारक संघटनेने घेतली अाहे.

महापालिका प्रशासनाने पाचपट दंडाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे मत मांडले अाहे. तसा अहवाल शासनाला पाठवला अाहे. यासंदर्भात संघटनेने अापली भूमिका जाहीर करत तीव्र लढ्याला तयार असल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले अाहे. नवीन गाळे करारासाठी मनपा पुढील ३० वर्षांचे भाडे सुमारे ४० ते ६० लाख रुपये एकरकमी मागत अाहे. एवढी प्रचंड रक्कम केवळ नूतनीकरणासाठी मागणे हा गरीब प्रामाणिकपणे नियमित कर भरणाऱ्या गाळेधारकांवर मनपाने केलेला क्रूरतेचा कळसच असल्याचे संघटनेने म्हटले अाहे. तीन वर्षांचे भाड्याचे पाचपट दंडाचे १० ते १५ लाख रुपयेही मनपा वसूल करण्याच्या तयारीत अाहे. रक्कम दिल्यास मालमत्तेवर बाेजा लावणार अाहे. एवढे भाडे मुघलकालीन जिझिया करालाही लाजवणारे असल्याचे पत्रकात म्हटले अाहे. एवढी प्रचंड, जीवघेणी रक्कम अामच्याकडून मनपा मागते अाहे. याचाच अर्थ अाम्हाला अायुष्यातून उठवण्याचेच धाेरण अाखल्याचे वाटत असून अामच्या मुलाबाळांना काय खाऊ घालू?, अामच्याशी एवढ्या अमानवीय पद्धतीने वागू नका, असे पत्रकात म्हटले अाहे.
बातम्या आणखी आहेत...