आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाळेधारकांच्या भूमिकेलाही हाेऊ शकताे पुन्हा विराेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून गाळेकराराचा येणारा प्रस्ताव राेखला गेल्याने नगरसेवकांचा जीव भांड्यात पडला अाहे. परंतु दुसऱ्याच दिवशी फुले मार्केटच्या गाळेधारकांनी दिलेला प्रस्तावदेखील त्याच धर्तीवर अाहे. त्यातही पालिकेचे जनतेचे हित नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत अाहेत. त्यामुळे खाविअासह अन्य पक्षांचा याला विराेधच हाेण्याची शक्यता अाहे. तर भाजपच्या नगरसेवकांची भूमिकाही महत्त्वाची ठरेल. महसूलमंत्री एकनाथ खडसे याबाबत काय भूमिका मांडतात, यावर बरेच काही अवलंबुन राहणार अाहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अडकलेल्या गाळे कराराच्या प्रस्तावावरून काही दिवस बरेच राजकारण रंगले. भाजपच्या नेत्यांनी मान्यता दिलेला प्रस्ताव अडचणीत अाणणारा असल्याने नगरसेवकांनीही याला विराेध केला हाेता. त्यामुळे एेनवेळी प्रस्ताव देण्याचा निर्णय घेत महासभेतील गैरहजेरी टाळण्यात अाली हाेती. महासभेनंतर महात्मा फुले सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांनी निवेदन देऊन प्रस्तावच सादर केला अाहे. यातूनही पालिकेला माेठी रक्कम मिळेल, असे दिसत नाही. कारण यातील काही मागण्या ह्या भाजपच्या नाकारण्यात अालेल्या प्रस्तावाशी मिळत्या जुळत्या असल्याचे सांगितले जात अाहे.

नगरसेवकांनानकाेय अस्वस्थता
महासभेनंतरगप्पागाेष्टीदरम्यान अनेक नगरसेवकांना अाता काेणताही ठराव करताना घबराट अाणि अस्वस्थतेचे वातावरण नकाे असल्याचे जाणवले. गेल्या अाठवडाभरात भाजपच्या नगरसेवकांच्या घरातील वातावरणही अस्थिर असल्याचे बाेलून दाखवले. नगरसेवक झालाे ते नागरिकांच्या समस्या साेडवण्यासाठी, समस्या साेडवणे तर दूर परंतु डाेक्याला नाहक ताप कशाला? अशाही भावना व्यक्त हाेत अाहेत. त्यामुळे जर काेणी पुन्हा २०१२ च्या रेडी रेकनरनुसार प्रस्ताव अाणण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सहज मान्यता मिळणे अाजतरी कठीण दिसते.

खडसेंची भूमिका महत्त्वाची
अामदारसुरेश भाेळेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजपच्या नगरसेवकांनी चुकीच्या निर्णयांना विराेध करण्याची भूमिका मांडली हाेती. त्यामुळे अामदार भाेळे यांनी कायद्याच्या चाैकटीत निर्णय घेण्याचे जाहीर केले. तसेच महसूलमंत्री खडसेंच्या उपस्थितीत बैठक घेणार असल्याचे सांगितले हाेते. पालिकेला जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल, यासाठी सर्व पक्षीय नगरसेवकांनी भूमिका जाहीर केली अाहे. अाता खडसे जनतेला गाळेधारकांना कशा पद्धतीने निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून अाहे.

अार्थिक उत्पन्न मिळणार
सभागृहानेकेलेल्या ठराव क्रमांक १३५ मध्ये शासनानेच याेग्य ताे बदल करून याेग्य ती भूमिका घ्यावी. शासनाला संपूर्ण अधिकार असतात. त्यामुळे अाता पुन्हा नवीन ठरावाचा काेणताच विषय नाही. २०१२ च्या रेडी रेकनरनुसार अाकारणीत पालिकेचे काहीही हित नाही. त्यामुळे अाता नवीन रेडी रेकनरनुसारच अाकारणी करावी लागेल. यातून पालिकेला अार्थिक उत्पन्न मिळणार अाहे. सुनीलमहाजन, उपमहापाैर
बातम्या आणखी आहेत...