आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग पद्धतीमुळे जन-धन योजनेच्या कामात सावळा गोंधळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पंतप्रधानजन धन योजनेत खाते उघडण्यासाठी नागरिकांना लगीनघाई झाल्याने बँकांमध्ये नागरिकांची दविसेंदविस गर्दी वाढू लागली आहे. त्यातच बँकांनी शहरातील प्रभाग वाटून घेतल्याने गोंधळात आणखीनच भर पडली आहे. बँकांमधील यंत्रणा पूर्णत: कोलमडल्याने येथे जाऊनही खाते उघडले जात नाही.

पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत नागरिकांना विविध सेवा-सुविधा पुरवल्या जाणार आहेत. नेमक्या सेवा कुठल्या असतील याविषयी केंद्र सरकारने स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. मात्र, खाते उघडणाऱ्या व्यक्तीसाठी एक लाखाचा अपघात विम्याची सुविधा मिळणार आहे. या योजनेचे खाते उघडण्यासाठी सर्वदूर प्रतिसाद चांगला मिळत आहे. त्यासाठी बँकांमध्ये तेवढी यंत्रणा नसल्यामुळे सावळा गोंधळ सुरू आहे. स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत तुटपुंज्या कर्मचाऱ्यांमुळे खाते उघडण्यासाठी विलंब होत आहे. त्यातच आता बँकांनी प्रभाग (वॉर्ड)निहाय काम वाटून घेतले आहे. सेंट्रल बँकेकडून प्रभागांची यादी मिळाल्याने सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे बँकेत जाणाऱ्या ग्राहकांना तुमच्या वॉर्डातील बँकेत जा, असे सांगितले जाते आहे. नेमक्या कोणत्या बँकेत जायचे याविषयी कुणालाच माहिती नसल्याने बँक अधिकाऱ्यांसोबतच ग्राहकही संभ्रमावस्थेत आहेत. या प्रकारामुळे गेल्या काही दविसांपासून यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे. एकापेक्षा जास्त खाते असलेल्या बँकांनी परिसरानुसार प्रभागांचे नियोजन करून घेतले आहे.

जन-धन योजनेसाठी २६ जानेवारीपर्यंत खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. सध्या प्रभागनिहाय बँकांचे वितरण केल्यामुळे बँका खाते उघडायला नकार देत असतील. मात्र, त्या वॉर्डातील बँकेशी नागरिकांनी संपर्क करायला हवा. दिलीपठाकूर, व्यवस्थापक,सेंट्रल बँक

गेल्या काही दविसांपासून बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी चकरा मारत आहे. वॉर्डनिहाय दिलेल्या बँकेतच खाते उघडले जाईल. यामुळे फरफट होत असून सरसकट कुठल्याही बँकेत खाते उघडण्याची सुविधा हवी. हेमराजदायमा, ग्राहक
खातेही लिंक होणार
जनधन योजनेसाठी घरोघरी जाऊन सर्व्हे केला जाणार आहे. शहरातील सर्व्हे दोन दविसात पूर्ण केला जाईल. यात खात्यांची तपासणी होऊन तसा अर्ज भरून घेतला जाईल. यात खाते असल्यास ते या योजनेशी लिंक केले जाणार आहे.

महिना अखेर आढावा
सप्टेंबरअखेरउघडलेल्या खात्यांचा आढावा घेऊन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. सद्य:स्थितीत ५० हजारांहून अधिक खाते उघडण्यात आले आहेत.

हीकागदपत्रे आवश्यक
आधारकार्ड,दोन फोटो. आधारकार्ड नसल्यास नगरसेवकाच्या लेटरहेडवरील पत्र.

प्रभागनिहाय बँका अशा
अलाहाबादबँक- २२, २३, ६७, आंध्र बँक- ५२, ५३, बँक ऑफ बडोदा- ११, १२, १३, ६८, बँक ऑफ इंडिया- ३,४, ५६, बँक ऑफ महाराष्ट्र- १५, १६, १७, ५७, कॅनरा बँक- ५०, ५१, सेंट्रल बँक- ६, ७, ५८, कार्पोरेशन बँक- २६, २७, देना बँक- ३६, ३७, ३८, आयडीबीआय बँक- ३२, ३३, ६९, इंडियन बँक- ४८, ४९, इंडियन ओव्हरसिस बँक- २४, २५, ओबीसी- ४४, ४५, पंजाब नॅशनल बँक- ५९, ६०, स्टेट बँक ऑफ हैदराबाद- ४२, ४३, स्टेट बँक ऑफ इंडिया- ८, ९, १०, ६१, ६२, ६३ (प्रभाग ८- मुख्य शाखा, ९- दादावाडी, १०- दाणा बाजार, ६१- शिव कॉलनी, ६२- महाबळ, ६३- जिल्हापेठ), सिंडिकेट बँक- १, २, युको बँक- ३९, ४०, ४१, युनियन बँक ऑफ इंडिया- १४, १८, १९, ६४, युनायटेड बँक- ५४, ५५, ६५, विजया बँक - २०, २१ , अ‍ॅक्सिस बँक- ३४, ३५, एचडीएफसी बँक- ३०, ३१, आयसीआय बँक- २९, ३०, महाराष्ट्र ग्रामीण बँक- ४६,४७, ६८