आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक कर्ज नाकारणाऱ्या सहा बँकांना ‘पीएमओ’ने दिले पत्र, विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - शहरातील एका विद्यार्थिनीला शैक्षणिक कर्ज नाकारणाऱ्या सहा बँकांची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) पत्राद्वारे विचारणा करण्यात आली आहे. भावना पितांबर सावकारे (रा.तिरुपतीनगर, यावल) या विद्यार्थिनीनी हवाई सुंदरी अभ्यासक्रमासाठी बँकांकडे शैक्षणिक कर्जाची मागणी केली होती. मात्र, वेळेवर आर्थिक मदत मिळाल्यानेे तिचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. 
 
शहरातील भावना सावकारे या विद्यार्थीनीची पुणे येथील एका शैक्षणिक संस्थेत निवड झाली होती. शैक्षणिक कोर्ससाठी विद्यार्थीनीने शहरातील सहा बँकांकडे लाख ९० हजार रुपये शैक्षणिक कर्जासाठी कागदपत्रे सादर केली होती. मात्र, बँकांनी कर्ज देण्यास टाळाटाळ केली. १९ ऑगस्टला विद्यार्थिनीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडे ऑनलाइन तक्रार नोंदवली. बेटी बचाओ, बेटी पढाओ असा देशात नारा देत असणाऱ्या सरकारच्या कार्यकाळात विद्यार्थिनींना शैक्षणीक कर्ज का नाकारले जात आहे?, असा प्रश्न तिने उपस्थित केला. विद्यार्थिनीला अशी वागणूक देणे चुकीचे असल्याचे तक्रारीत नमूद केले. 
 
या बँकांचा समावेश 
यावलमधीलस्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, आयडीबीआय बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, जळगाव जनता बँक बुलडाणा अर्बन या बँकांकडे भावनाने शैक्षणिक कर्जासाठी विनंती केली होती. 
 
‘पीएमओ’चे पत्र प्राप्त 
पीएमओ कार्यालयाकडून कर्ज का नाकारले, या संबंधी विचारणा झाली आहेे. विद्यार्थिनीने कर्ज मागितले त्या वेळी स्टेट बँकेच्या कर्ज वितरण व्यवस्थेत बदल सुरू होते. त्यामुळे त्यांना कर्ज उपलब्ध होऊ शकले नाही, अशी प्राथमिक माहिती स्टेट बँकेचे व्यवस्थापक राजेश पटेल यांनी ‘दिव्य मराठी’सोबत बोलताना दिली
बातम्या आणखी आहेत...