आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Podar School And Change Rally Isse At Nashik, Divya MarathiPodar School, Change Rally ,issue At Nashik,

पोदार स्कूलने काढली परिवर्तन रॅली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मी ठरवणार’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी परिवर्तनाचा संदेश दिला. पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. दर महिन्याला विविध विषय घेऊन त्यावर उपक्रम राबवला जातो. या अंतर्गत नुकतीच विद्यार्थ्यांची परिवर्तन रॅली काढण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीचे उद्घाटन इनरव्हील क्लब न्यू जेनच्या अध्यक्षा विदेहा जैन यांनी केले. ही रॅली शिवाजी महाराज पुतळ्यापासून नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौक ते बहिणाबाई उद्यानापर्यंत काढण्यात आली.

शाळेचे प्राचार्य अँग्नेल कर्व्हालो यांनी शाळेतील तरुणांना देशाचे प्रश्न, समस्यांविषयी माहिती मिळावी, तसेच आपल्या समोरील समस्येला कसे सामोरे जाता येईल, त्यावर कशी मात करता येईल या विषयांवर मार्गदर्शन केले. परिवर्तन रॅली 2014-15 ही लोकांच्या हितार्थ व लोकांना सशक्त करण्याच्या उद्देशाने काढण्यात आली असल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक डी.एस.शिंगारे उपस्थित होते. रॅलीसाठी व्यवस्थापक जितेंद्र कापडे, कार्यक्रम समन्वयक रुबिना सय्यद, रचना सोनवणे, वाहतूक पोलिस विभागीय कर्मचारी, पोलिस अधीक्षकांचे सहकार्य मिळाले.
रॅलीत दिला संदेश
रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची पोस्टर्स प्रदर्शित केली. यात लोकशाही बळकट करण्यासाठी देशातील समाजासमोरील समस्या कोणत्या आहेत? हे मांडण्यात आले. यात भ्रष्टाचार, बालमजूर, विकलांग, वर्णभेद, असमानता नष्ट व्हायला हवे असा संदेश देण्यात आला. त्याचप्रमाणे रॅलीनंतर लोकशाहीत लोकसभा, ग्रामसभा कशी भरवली जाते, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.