आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोदार स्कूलमध्ये दोन तास ठिय्या; मान्यता रद्द होणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरा पासूनजवळच असलेल्या पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाने एका विद्यार्थ्याला आठवीत अनुत्तीर्ण केले. तसेच पालकांनी शुल्क भरले नाही, म्हणून दोन महिने वर्गात बसू दिले नाही. त्याला ग्रंथालयात बसविले. यावरून संतप्त झालेल्या लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी शाळेत दोन तास ठिय्या आंदोलन केले. या वेळी शकि्षणाधकिारी मोहन देसले यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे तर पोलिसांनी पालकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या कारभाराविषयी पालकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्याकडे शकि्षणाधकिारी कार्यालयाने दुर्लक्ष केले. शाळा व्यवस्थापनाने पवन छोटू वरसे या इयत्ता आठवीत शकि्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला शकि्षण हक्क कायदा धाब्यावर बसवत अनुत्तीर्ण केले. तसेच पालकांनी शुल्काचा भरणा केला नाही म्हणून मुजोर शाळा व्यवस्थापनाने संबंधित विद्यार्थ्यास दीड महिन्यापासून वर्गात बसू दिले नाही. हा विद्यार्थी रोज शाळेत येत असताना त्याला चक्क ग्रंथालयात बसवण्यात येत होते. याबाबत पालक छोटू वरसे यांनी माध्यमकि शकि्षणाधकिाऱ्यांसह लोकसंग्रामकडे तक्रार केली. त्यानंतर लोकसंग्रामच्या पदाधकिाऱ्यांनी गुरुवारी सकाळी माध्यमकि शकि्षणाधकिारी कार्यालयातील अधकिाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास लोकसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाणे, अमोल सूर्यवंशी, शकि्षणाधकिारी मोहन देसले, उपशकि्षणाधकिारी शांतिलाल मोरे, अधीक्षक प्रमोद पाटील, विस्तार अधकिारी देशमुख यांनी शाळेला भेट दिली. त्यांनी या प्रकाराची माहिती घेतली.
दरम्यानच्या काळात लोकसंग्रामचे तेजस गोटे, पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या प्रशकि्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक वर्षा पाटील पथकासह शाळेत दाखल झाले. या वेळी शाळेचे व्यवस्थापक सुनील कुलकर्णी तसेच प्राचार्य रॉय यांना त्यांनी या प्रकाराची विचारणा केली. या वेळी देण्यात आलेल्या माहितीत तफावत आढळल्याने शकि्षण विभागाचे अधकिारी अवाक् झाले. दरम्यान याच वेळेच दिनेश देवरे यांनीही त्यांच्या मुलीस बसचे शुल्क भरले नसल्याने बसमध्ये बसू दिले जात नसल्याची तक्रार केली. या वेळी आंदोलनकर्त्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी तसेच संबंधित अधीक्षक, प्राचार्य यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर शकि्षणाधकिाऱ्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी शकि्षण उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार तसेच पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आहेत त्रुटी

- शकि्षण हक्क कायदा डावलत आठवीच्या विद्यार्थ्याला शाळेने केले अनुत्तीर्ण.
- विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न होतच नसल्याच्या पालकांच्या तक्रारी.
- सोनगीर येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनीस बसमधून खाली उतरविले.
- शकि्षणाधकिाऱ्यांच्या सूचनांनाही शाळेच्या प्रशासनाने दाखविली केराची टोपली.
- शकि्षण शुल्क वेळेवर दिले नाही म्हणून विद्यार्थ्याला वर्गात बसण्यापासून डावलले.
- अवास्तव शुल्कवाढीच्या तक्रारी करूनही शकि्षण विभागाने केला शाळेच्या मनमानीकडे कानाडोळा.

- विद्यार्थ्याच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार करता चार महिन्यांपासून विद्यार्थ्याला शाळेत चुकीची वागणूक दिली जात आहे. मुलाला अनुत्तीर्ण करा, असे बळजबरीने लिहून घेतले. त्याचबरोबर त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळेने प्रयत्न केले नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे. छोटूवरसे, पालक

- पालकांच्यातक्रारी अधीक्षक, प्राचार्यांनी दिलेल्या माहितीत तफावत आहे. त्यामुळे अहवाल तयार करून शाळेची मान्यता रद्द करण्यासंदर्भात शकि्षण उपसंचालकांकडे शिफारस करण्यात येईल. मोहनदेसले, शकि्षणा धकिारी