आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीला चारचाकीत ओढून मारहाण करणारा ‘प्रेम’ जेरबंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरात छेडखानीच्या घटनांनी कहरच केला अाहे. पाेलिस कडक कारवाई करीत नसल्याने टवाळखाेरांची हिंमत वाढली अाहे. साेमवारी तर हद्द झाली. मू.जे. महाविद्यालयाजवळील एकलव्य क्रीडा संकुलाजवळ दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणीला प्रेम साेनी या तरुणाने मारहाण करीत जबरदस्तीने चारचाकीत बसवले. त्यानंतर तिला धावत्या गाडीत मारहाण केली. हा प्रकार पाेलिसांना लक्षात अाल्यानंतर त्यांनी गाडीचा पाठलाग करून तरुणीची सुटका केली.
एकलव्य क्रीडा संकुलाजवळ दुपारी ११.३० वाजता माेना (नाव बदललेले अाहे) रस्त्यावर उभी हाेती. या वेळी प्रेम साेनी (वय १९ रा.जयनगर) याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावर थांबता त्याने माेनाला त्याच्या चारचाकीत जबरदस्ती बसवून मारहाण करत प्रभात चाैकाच्या िदशेने जात हाेता. हा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी भास्कर पाटील आणि विनोद चौधरी यांनी पाहिला. त्यांनी लागलीच माेटारसायकलीने चारचाकीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. ताेपर्यंत माेटारसायकलीवर मागे बसलेल्या एका पाेलिसाने ही घटना जिल्हापेठ पाेलिसांना कळवली. ते देखील लागलीच रवाना झाले. पाेलिस पाठलाग करीत असल्याचे पाहून प्रेम साेनीने पोलिसांच्या दुचाकीला धडक देण्याचा प्रयत्न केला. पण पाेलिसांनी सावधानता बाळगल्याने ते बचावले.
प्रभात चौकात पाेलिस चारचाकी अडवण्यात यशस्वी झाले. गाडी अडवल्यानंतरही प्रेम हा माेनाला मारहाण करत होता. त्याने चारचाकी अातून लॉक केलेली असल्यामुळे माेनाला बाहेर पडणे शक्य होत नव्हते. या वेळी चारचाकीला पाेलिसांनी चहू बाजूने घेरल्यानंतर अखेर त्याने गाडीचा लाॅक उघडला. त्याला पाेलिसांनी ताब्यात घेऊन िजल्हापेठ पाेलिस ठाण्यात अाणले. या वेळी माेनाने तरुणाविराेधात फिर्याद देण्याची तयारी दर्शवली हाेती. मात्र, दोन्ही कुटंुबीयांनी आपसात चर्चा करून समजोता केला. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकला नाही. मात्र, घडलेल्या प्रकाराबाबत जिल्हापेठ पोलिसांनी प्रेम सोनी याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून साेडून िदले. तसेच त्याच्या चारचाकीला नंबर प्लेट नसल्यामुळे दंड करण्यात आला आहे. प्रेमच्या चारचाकीने चार महिन्यांपूर्वी ख्वाजामियांॅ चौकात टपरीला धडक दिली होती.
लक्ष ठेवण्याची पालकांचीच जबाबदारी
पालक मुलांना महागडे मोबाइल्स, दुचाकी, चारचाकी सहज उपलब्ध करून देतात. मात्र, तंत्रज्ञानाचे फायदे गैरफायदे यातील अंतर मुले विसरत आहेत. त्यावर नियंत्रण आणले पाहिजे, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ.अमोल महाजन यांनी सुचवले आहे. पालकांनी जबाबदारीने मुलांवर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे.
रोजीच्या घटनेची पुनरावृत्ती
शुक्रवारीकोल्हे हॉस्पिटल परिसरातून चारचाकीतूनच प्रेमीयुगुलाने अपहरण नाट्य रंगवले होते. याप्रकरणी मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर सोमवारी युवकाने धावत्या चारचाकीत युवतीला मारहाण केल्याचा प्रकार घडला. शहरात टीनएजर्सच्या टवाळखोरीमुळे पालक पोलिसांची होणारी फरफट ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केली होती.
यापूर्वीही तरुणीची तक्रार
पीडित माेनाला या पूर्वीही प्रेम सोनी याने त्रास दिला आहे. त्या-त्या वेळी माेनाने पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. अखेर सोमवारी घडलेला प्रकार अत्यंत धोकादायक असल्यामुळे त्या युवकाविरोधात पाेलिसात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात हालचाली सुरू होत्या. मात्र, दोघांचेही शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रेमला ताकीद देऊन सोडून देण्यात आले आहे.