आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूचोर निघाले भाजप, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पाच जणांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राजकीय पक्षातील पदे, नेत्यांच्या नावाचा आश्रय घेत रात्री वाळूची चोरी करणा-या भाजपचे राहुल अशोक तिवारी राष्ट्रवादीचे अजय बढे यांच्यासह पाच जणांवर तालुका पोलिस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरासह जिल्ह्यात वाळू सम्राटांनी नद्या ओरबाडून काढल्या आहेत. राजकीय वरदहस्ताचा वापर करून रात्रभर वाळू वाहतूक विक्रीचा काळा बाजार सुरू असतो. आव्हाणे येथील तलाठी मोहन पुंडलीक सोनार यांनी मंगळवारी रात्री ११.३० वाजता आव्हाणे रोड येथून बुधवारी सकाळी वाजता खेडी खुर्द, भादली बुद्रूक येथे वाळू चोरी करून अवैध वाहतूक करणाऱ्या चार डंपर जप्त केल्या. यातील भाजप कार्यकर्ते राहुल तिवारी यांच्या मालकीच्या डंपरवर क्रमांकही नव्हता. तर राष्ट्रवादीचे अजय बढे आणि धनराज सोनवणे यांचे एमएच १९ झेड ९०९० आणि मुकुंद सपकाळे नाना ठाकरे यांच्या मालकीचे एमएच ११ एएल २२६३ हे डंपर जप्त केले. या पाचही जणांवर तालुका पोलिस ठाण्यात वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिस शिपाई राजेंद्र बोरसे मनोज पवार हे तपास करीत आहेत. ब्रास वाळू तीन डंपर जप्त करून तालुका पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आले आहे. तहसील कार्यालयात जप्त करून आणलेले वाळूचे डंपर. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मदतीनेच काळा बाजार सुरू असतो. पक्षाचे कार्यकर्ते चुकत असतील तर पोलिसांनी कारवाई करावी. पक्ष नेत्यांचा यात काहीएक संबंध नसतो. हा कार्यकर्त्यांचा वैयक्तिक व्यवहार आहे. सुरेशभोळे, आमदार
आव्हाणे रस्त्यावर नुकताच अपघात
आव्हाणेरस्त्यावर जानेवारी रोजी आयशर ट्रकने दोन दुचाकींना उडवले होते. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला हाेता. अपघातानंतर गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. एवढेच नव्हे तर तहसीलदार गोविंद शिंदे यांना घेराव घातला. अपघात जरी आयशर ट्रकने केला असला तरी, या रस्त्यावरून रात्रभर अवैध वाळू वाहतूक होत असल्याचा रोष गावकऱ्यांनी व्यक्त केला होता. पोलिस आणि महसूल प्रशासनाने कारवाई करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, या घटनेला आठ दिवस होत नाहीत, तोच तेथून पुन्हा वाळूचे डंपर वाहतूक करीत असल्याचे प्रकार घडत आहेत.
दिवसा नागरी समस्यांवर आंदोलने, रात्री चोरी
सर्वचराजकीय पक्षांकडून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलने, उपोषणे केली जातात. सत्तेत असलेल्या पक्षांकडून आश्वासने दिली जातात. त्यातच शहरातील अनेक रस्ते वाळूचे ट्रक, डंपर ट्रॅक्टर वाहतुकीमुळे खराब झाले आहेत. यासाठी लोक राजकीय पक्षांसोबत रस्त्यांवर उतरत आहेत. दिवसा आंदोलने करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांचीच वाळूची वाहने रात्री रस्ते खराब करीत आहेत. तसेच अनेक बिल्डर्सही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. त्यामुळे एकीकडे सामान्यांच्या समस्या सोडवण्याच्या आणाभाका करणारे कार्यकर्ते वाळूचोरीच्या गुन्ह्यात गुरफटलेले असल्याचे या घटनांमुळे समोर आले आहे.