आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३७ दुचाकी चालकांवर पाेलिसांची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात भरधाव दुचाकी चालवणाऱ्या तसेच विनाक्रमांक, फॅन्सी नंबर प्लेट, वाहन चालवण्याचा परवाना नसताना गाडी चालवणे, ट्रीपल सीट गाडी चालवणे, अशा ३७ दुचाकीचालकांवर साेमवारी शहर वाहतूक विभागाने कारवाई केली.

शहर वाहतूक शाखेतर्फे साेमवारी विविध चाैकांमध्ये भरधाव माेटारसायकल चालवणाऱ्यांवर कारवाई केली. दुचाकीचालकांनी पुन्हा चूक केली तर त्यांच्या गाडीची नाेंदणी रद्द करण्याचा इशारा निरीक्षक चंद्रकांत सराेदे यांनी दिला अाहे.

टाॅवर चाैक ते घाणेकर चाैक ‘नाे पार्किंग’ झाेन
टाॅवर चाैक ते घाणेकर चाैकदरम्यान वाहनांच्या पार्किंगसाठी तात्पुरती साेय महापालिकेच्या साने गुरुजी चाैकाजवळील माेकळ्या जागेत करण्यात अाली अाहे. त्यामुळे टाॅवर चाैक ते घाणेकर चाैकादरम्यान काेणीही वाहने पार्किंग करू नये, असे अावाहन शहर वाहतूक विभागातर्फे केले अाहे.