आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेसमाेर राेडराेमिअाेंना दिली ऊठबश्यांची शिक्षा, गस्ती पथकाची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील कन्या शाळेजवळ उभे राहून अारडाअाेरड करीत राेमिअाेगिरी करणाऱ्यांना मंगळवारी पाेलिसांनी अद्दल घडविली. गस्ती पथकाने टवाळखाेर युवकांना शाळेसमाेरच रस्त्यावर ऊठबश्या काढायला लावल्या. त्यांना पाेलिस ठाण्यात नेऊन नातेवाइकांसमाेर समज दिली. त्यांच्याकडून पुन्हा असा प्रकार हाेणार नाही, अशी ग्वाही नातेवाइकांनी दिली. पाेलिस डायरीत त्याची नाेंद करून संबंधितांना साेडले.

 

शहर ठाण्याच्या विशेष शाखेचे कर्मचारी इतर पाेलिसांंनी शैक्षणिक चाैक ते झाशी राणी चाैक परिसरात सकाळी दहा ते अकरा वाजेता पेट्राेलिंग केली.त्यांना कन्या शाळेसमाेर असलेल्या व्यापारी संकुलाजवळ काही युवक हे अारडाअाेरड करीत असल्याचे अाढळले. त्यांना ताब्यात घेतले. ते या ठिकाणी कशासाठी उभे अाहेत याबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यांच्याकडून मुलींची छेडखानी केली जात असल्याच्या संशयावरून पाेलिसांनी त्यांना सर्वांसमाेर रस्त्यावर ऊठबश्या काढायला लावल्या. या प्रकाराने परिसरात गर्दी झाली हाेती. नंतर या ठिकाणी असलेल्या ११ जणांना पाेलिस ठाण्यात नेण्यात अाले. त्यांच्या नातेवाइकांना पाेलिस ठाण्यात बाेलावण्यात आले.

 

डायरीत नोंद
याबाबत स्टेशन डायरीत नाेंद घेऊन नातेवाईक अाणि प्रतिष्ठित नागरिकांसमाेर त्यांना समज दिली. तसेच यापुढे असा प्रकार करण्याबाबतची ग्वाही घेऊन संबंधितांना साेडले. त्यांच्या भविष्याचा विचार करून नावे जाहीर करण्यास पाेलिसांनी नकार दिला.

 

बातम्या आणखी आहेत...