आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Administration Face Examination In Municipal Corporation Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेच्या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलिस प्रशासनाचीच ‘परीक्षा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तारीख आणि पीएसआयपदाची परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे पोलिस प्रशासनालाच ‘परीक्षा’ देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाला शेजारील जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिस कुमक मागवावी लागणार असून यामुळे प्रशासनाची चांगलीच कसरत होणार आहे. परीक्षेसाठी जिल्ह्यातून सुमारे 500 पोलिस कर्मचारी जाणार आहेत.

पोलिस शिपाईपदावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना परीक्षेच्या माध्यमातून पदोन्नती मिळावी यासाठी नाशिकला पीएसआयपदासाठी 30, 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी परीक्षा होत आहे. याच काळात म्हणजे 1 सप्टेंबरला पालिकेसाठी मतदान होणार असल्यामुळे दोन दिवसआधीच शहरात बंदोबस्त लावण्यात येईल. नेमके याचवेळी जिल्ह्यातील 500 पोलिस कर्मचारी परीक्षेला जाणार असल्याने प्रशासनाची चांगलीच गोची होणार आहे. त्यामुळे पोलिस दलास आतापासूनच पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

2008 मध्ये 1608 कर्मचार्‍यांचा बंदोबस्त
गेल्या पंचवार्षिकच्या महापालिका निवडणूक 2008मध्ये 1008 पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि 600 गृहरक्षक दलाचे जवान मिळून 1608 जणांनी बंदोबस्त ठेवला होता. शहराची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता निवडणूक काळात मोठे गुन्हे घडण्याची शक्यता लक्षात घेता पोलिस बंदोबस्ताची गरज भासणार आहे. त्यामुळे आता पोलिसांना शेजारील जिल्ह्यातून कुमक मागविण्याची वेळ येणार आहे. गेल्या निवडणुकीपूर्वी व मतदानाच्या दिवशी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रo्न निर्माण झाला होता.

पोलिस प्रशासनाचा लागणार कस
महापालिका निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा 16 ऑगस्ट रोजी पूर्ण होणार आहे. याच दिवशी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्ताचे नियोजन केले जाणार आहे. पोलिस प्रशासनाकडे नियोजनासाठी जास्त दिवस मिळणार नसल्यामुळे आता प्रशासनाचा कस लागणार आहे.


शेजारील जिल्ह्याची मदत
पीएसआयपदासाठी राज्यातील पोलिस कर्मचारी परीक्षा देणार आहेत. यात जिल्ह्यातील पोलिसांचाही समावेश राहील. त्यामुळे पालिका निवडणुकीसाठी शेजारील जिल्ह्यातील कुमक मागवली जाईल. -वाय.डी.पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी (गृह)