आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Administration, Latest News In Divya Marathi

कारमध्ये आढळली सात लाखांची रोकड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- पोलिसांसहमहसूल विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी दुपारी 12.30 वाजता, यावल नाक्यावर जळगावला जाणा-या कारमधून सात लाखांची रोकड जप्त केली. चौकशीनंतर ही रोकड संबंधितांना परत करण्यात आली.
रावेर येथील दत्त अग्रो कंपनीचे महेंद्र मुरलीधर पाटील हे कारने (क्रमांक- एमएच- 19, एएक्स- 666) रावेरहून जळगावला जात होते. भरारी पथकाने त्यांच्या कारची यावल नाक्यावर तपासणी केली. कारमध्ये पथकाला सात लाखांची रोकड आढळली. याप्रकरणी गाडीमालक पाटील यांना प्रांताधिकारी कार्यालयात नेण्यात आले. पथक प्रमुख एम.बी. तीर्थकर, हवालदार वसंत लिंगायत, गोरख पाटील, बापू होनमाने यांनी त्यांची चौकशी केली. संबंधित रक्कम बँकेत भरण्यासाठी जळगाव येथे जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. याबाबतचे पुरावे त्यांनी सादर केल्यानंतर पथकाने रोकड परत केली. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार भांगरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली हिंगे यांनीही माहिती जाणून घेतली.