आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी ठेचण्यासाठी मोक्का, हद्दपारीचे प्रस्ताव तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील शांततेला गालबोट लावून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणा- गुंडांवर पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याअंतर्गत शहर परिसरातील १२ ते १३ गुंडांवर मोक्का तसेच हद्दपारीची कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असल्याची माहिती पोलिस प्रशासनातर्फे देण्यात आली.

गुन्हेगारी ठेचण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून शहर परिसरातील १५ पोलिस ठाणे, गोपनीय शाखा वरिष्ठ अधिका-यांना विविध सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे माेठे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर आता दरोडा, रस्तालूट, जबरी चोरी, दंगल, खंडणी, खून, प्राणघातक हल्ला यासारख्या गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या संशयितांवर मोक्कानुसार कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय काही गुंडांचे हद्दपारीचे प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. मोक्का हद्दपारीच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर शहरातील गुन्हेगारी ठेचण्यास मदत होणार आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईची चाहूल लागल्यामुळे गुंडांना धडकी भरली आहे.
पोलिस ठाण्यांतील कर्मचा-यांना दिल्या सूचना

हत्यारांचा वापर जास्त
सध्यापोलिस विभागाकडून पत्रकार परिषदांमध्ये पकडलेले आराेपी हत्यारे सादर केली जात आहेत. यावरून गुन्ह्यांमध्ये हत्यारांचा मोठा वापर होतो, असे दिसते. सध्या काही गुन्हे उघडकीला येत आहेत; परंतु हिस्ट्रिसीटर असलेल्यांवर योग्यरीत्या नजर ठेवली जात नाही. त्यामुळे नवीन काही चेहरे गुन्हेगारीकडे वळताना दिसतात.

गुन्हेगारीत झाली वाढ
शहराच्या गुन्हेगारीत गेल्या तीन महिन्यांच्या काळात वाढ झाली आहे. कायदा‑सुरक्षा राबवताना पोलिसांवर ताण येतो; परंतु गुन्हे घडल्यानंतर हा ताण दुपटीने वाढतो. जुने धुळे तसेच त्यासारख्या संवेदनशील परिसरात घडलेल्या घटनांमध्ये शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या वळणावर येत असल्याचे पोलिसांचेही मत झाले आहे.