आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Administration,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणपतीनगरात 24 कॅमेरे ठेवणार नजर, रहिवाशांचा पुढाकार, पोलिस प्रशासनाची मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मुंबई, पुण्याच्या धर्तीवर जळगाव शहरातील गणपतीनगरचा परिसरही अत्याधुनिक होण्याच्या मार्गावर आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील रहिवाशांनी पुढाकार घेऊन संपूर्ण परिसरात 24 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवडाभरात हे कॅमेरे बसवले जाणार आहेत. 'दिव्य मराठी' ने नागरिकांना आवाहन करून सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्यास प्रोत्साहीत केले होते. गणपतीनगरवासियांनी या आवाहनाला सक्रिय प्रतिसाद दिला आहे.
गणपतीनगर परिसर शहरातील सधन भाग गणला जातो. दोन महिन्यांपूर्वी या भागातील दिलीप झांबड यांच्याकडे घरफोडी झाली होती. या घटनेनंतर रहिवाशांना सुरक्षिततेचा प्रश्न सातत्याने सतावत होता. त्यावर उपाययोजना म्हणून नागरिकांनी कॉलनीतच एक समिती स्थापन करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वेळोवेळी बैठका घेऊन, नियोजन पूर्ण झाल्याने आठवड्यात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या भागात सुमारे तीन हजार लहान-मोठे बंगले आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : या ठिकाणी अत्याधुनिक पेन कॅपच्या आकाराचे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. ते सहजासहजी कुणाला दिसणार नाहीत. त्यामुळे त्यांचे नुकसान टाळता येईल. रात्रीही स्पष्ट दृष्य दिसण्याची व्यवस्था त्यात आहे.
पोलिसांनी दिला सल्ला : गणपतीनगरातील एका शिष्टमंडळाने पोलिस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव यांची भेट घेऊन हा उपक्रम सांगितला. त्यांनी मार्गदर्शन करून तो अधिक प्रभावीपणे राबवण्या सल्ला दिला होता.
आदर्श वसाहत निर्माण करणार : सीसीटीव्ही कॅमे-याच्या निमित्ताने एकत्र आलेले गणपतीनगरातील रहिवासी या परिसराला आदर्श वसाहत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. टीव्हीवरील मालिकांच्या धर्तीवर येथील सर्व-जाती धर्मांचे रहिवासी एकत्रितपणे सण-उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करतील, असे नियोजन करण्यात येत आहे.
असा आहे आराखडा : गणपतीनगरात प्रवेश करण्यासाठी एकूण 10 लहान-मोठे रस्ते आहेत. या सगळ्या रस्त्यांवर प्रत्येकी दोन याप्रमाणे 20 आणि कॉलनीत चार असे एकूण 24 कॅमेरे बसवले जाणार आहेत. यासाठी कॉलनीतील नागरिकांनी वर्गणीतून तीन लाख रुपये गोळा केले आहेत. आठवडाभरात हे कॅमेरे कार्यान्वीत होणार आहेत.