आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट - पोलिस चौक्यांमध्ये कर्मचारी हजर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील विविध पोलिस चौक्यांमध्ये कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर चौक्यांमध्ये उपस्थित राहत नसलेल्या कर्मचा-याना वरिष्ठांनी धारेवर धरत संबंधितांची ‘हजेरी’ घेतली. त्यामुळे नेहमीच ओस असणा-या पोलिस चौक्यांमध्ये कर्मचारी दिसून आले.
शहरातील आझादनगर आणि धुळे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 10 पोलिस चौक्या आहेत. या चौक्यांची ‘दिव्य मराठी’ने पाहणी केली होती. त्यात कर्मचारी पोलिस चौक्यांमध्ये राहत नसल्याचे दिसून आले होते. याबाबत दिव्य मराठीने मंगळवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिका-यानी या कर्मचा-याची झाडाझडती घेतली. तसेच कर्मचा-याना चौकीत राहण्याचे आदेश दिले. त्यामुळे सकाळपासून पोलिस चौक्यांमध्ये कर्मचारी दिसून आले. याबाबत कर्मचा-याशी संवाद साधला असता कामाचा अतिरिक्त ताण तसेच मनुष्यबळाचा अभाव हे कारण सांगण्यात आले.