आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाखनीनगरात दांपत्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- घर रिकामे करण्याच्या कारणावरून शुक्रवारी रात्री कंजरवाडा भागातील जाखनीनगरात हाणामारी झाली. या हाणामारीत वीणा आणि राम तमाईचेकर हे दाम्पत्य जखमी झाले. या घटनेनंतर सोमवारी पुन्हा जुन्या भांडणाच्या कारणावरून तमाईचेकर दाम्पत्याच्या अंगावर रॉकेल टाकू न त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्‍न झाला. सुदैवाने त्यांनी पळ काढल्यामुळे पुढील अनर्थ टळला. हे दाम्पत्य सिव्हीलमध्ये उपचार घेत आहेत.
तमाईचेकर यांच्या शेजारी राहणार्‍या आकाश अरुण दहियेकर याने शुक्रवारी त्यांना घर सोडण्याच्या वादातून मारहाण केली होती. या विषयीची तक्रार पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. या घटनेचा राग आल्यामुळे दहियेकरचे नातेवाईक असलेल्या केसरबाई दहियेकर, गीता अभंगे, मीनाक्षी दहियेकर, शब्बो (पूर्ण नाव माहीत नाही) आणि वीर बादल दहियेकर यांनी सोमवारी सकाळी 6.45 वाजता पुन्हा तमाईचेकर दाम्पत्यावर हल्ला चढवला. दोघांसह तीन वर्षांची मुलगी दिव्या झोपेत असताना त्यांच्या अंगावर रॉकेल टाकू न त्यांना पेटवण्याचा पयत्‍न केला. हा प्रकार त्यांचा मुलगा आदित्य याच्या लक्षात आल्यानंतर संपूर्ण कुटुंबाने पळ काढला. या वेळीही त्यांना मारहाण करण्यात आली.