आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज कुमारांच्या वेशात आले पोलिस; 22 रोमिओंना पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- शहरातील शाळा महाविद्यालयांच्या परिसरात रोडरोमिओगिरी करणाऱ्यांबाबत पोलिसांकडे तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेत शुक्रवारी सहायक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी विशेष मोहीम राबवली. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वेशातील तीन पथकांची त्यांनी नियुक्ती केली. या पथकांनी शुक्रवारी सकाळी दीड तासात २२ टवाळखोरांना पकडले. 
 
रोडरोमिओंचा त्रास वाढल्याबाबत बी.झेड.उर्दू हायस्कूलच्या संस्थाचालकांनी पोलिसांना पत्र दिले होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ११.३० ते या वेळेत बी.झेड.उर्दू हायस्कूल, डी.एस.हायस्कूल आणि डी.एल.हिंदी हायस्कूलच्या परिसरात मोहीम राबवण्यात आली. यासाठी सहायक पाेलिस अधीक्षक नीलाेत्पल यांनी अारसीपी अाणि ईअारटी पथकातील १२ पाेलिस कर्मचाऱ्यांची तीन पथके नियुक्त केली होती. प्रत्येक पथकात चार पोलिसांचा समावेश होता. पथकातील पोलिसांनी महाविद्यालयीन युवकांप्रमाणेच पेहराव केला होता. त्यामुळे टवाळखोरांना पोलिसांचा सुगावा लागला नाही. पोलिस कर्मचारी माणिक सपकाळे, विकास सातदिवे, राहुल चाैधरी, उमाकांत पाटील, प्रदीप इंगळे यांच्यासह अारसीपी एअारटीच्या पथकाने तिन्ही शाळांबाहेर एकूण २० टवाळांना पकडून डीवायएसपी कार्यालयात हजर करण्यात आले. 
 
गस्त सुरूच राहणार 
शाळा आणि महाविद्यालयांबाहेर साध्या वेशातील पोलिसांची नियमित गस्त सुरू राहणार आहे. तसेच अागामी गणेशाेत्सव, दुर्गाेत्सवाच्या काळात राेमिअाेगिरी करणाऱ्यांवर कारवाई हाेईल. 
- नीलाेत्पल, सहायक पाेलिस अधीक्षक 
 
पालकांसमोर समज 
सर्व टवाळांना संबंधित हद्दीतील पोलिस ठाण्यांकडे पाठवण्यात आले. त्यानंतर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना पालकांसमोर त्यांना समज दिली. तसेच पुन्हा रोमिओगिरी करताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. 
 
अभ्यासावर लक्ष द्या 
पकडलेल्या टवाळांना सहायक पाेलिस अधीक्षक नीलाेत्पल यांच्यासमाेर हजर करण्यात आले. नीलाेत्पल यांनी सर्व युवकांची चांगलीच कानउघाडणी केली. वेळ वाया घालवण्याऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा, अशी सूचना त्यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...