आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीत पकडली दारू; जिल्हापेठ, शनिपेठ पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पोलिसांनी गेल्या आठवड्यापासून शहरातील अवैध धंद्याविरोधात धाडसत्र सुरू केले आहे. मंगळवारी प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने एमआयडीसीत धाड टाकून देशी-विदेशी दारूचा मद्यसाठा पकडला. तर जिल्हापेठ शनिपेठ पोलिसांनी जुगारावर धाड टाकून एक लाखावर मुद्देमाल जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
 
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आर.एल. चौकाजवळील हॉटेल सागर या ढाब्यावर बेकायदारीत्या विनापरवाना दारू विक्री होत असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर पाटील यांनी त्यांच्या पथकाच्या मदतीने सायंकाळी हॉटेल सागर या ढाब्यावर अचानक धाड टाकली. या वेळी ढाबा-मालक नारायण सोनवणे हा विनापरवाना दारू विक्री करताना आढळून आला. या कारवाईत पथकाने हजार १८० रुपयांच्या रोकडसह १० हजार १२८ रुपयांची दारू जप्त केली. यानंतर पथकाने मालक नारायण सोनवणे याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यास ताब्यात घेतले. ही कारवाई प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक पाटील यांच्यासह पथकातील अनिल कांबळे, सुभाषशिंदे, योगेश इंधाटे, प्रभुसिंग जागरवाल, तेजस मराठे, प्रकाश कोकाटे, सलीम शेख यांनी केली.
 
जुगार खेळणाऱ्यांकडून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
आकाशवाणीचौकात हाॅटेल मुरली मनाेहरसमाेरील रस्त्यावर नितीन प्रल्हाद शिरसाळे, रुपराज रमेश देवरे, योगेश हरी वाघ अय्युब सरदार पठाण हे रिक्षा लावून झन्नामन्ना नावाचा पत्याचा जुगार खेळत खेळवत होते. जिल्हापेठ पोलिसांनी या जुगारावर धाड टाकली त्यांच्याकडून एमएच १९, व्ही ७६०४, एमएच १९, व्ही ९०३३ एमएच १९, व्ही ८८४८ या तीन रिक्षांसह लाख ५० हजार ६०९ मुद्देमाल पत्यांचा कॅट जप्त केला आहे. त्याचप्रमाणे शनिपेठ पोलिसांनी इस्लामपुरा भागातील मरिमातेच्या मंदिराजवळ सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली. यामध्ये भीमराव सुखदेव वानखेडे (रा. रायपूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
९१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
गुजरालपेट्रोल पंपाजवळील एन. एन. वाइन शॉपजवळ भिंतीच्या आडोशाला सुरू असलेल्या कल्याण मटक्याच्या जुगार अड्ड्यावर जिल्हापेठ पोलिसांनी दुपारी वाजेच्या सुमारास धाड टाकली. या वेळी जुगार खेळणारे दिलीप आबा भोसले (रा. शाहुनगर), दिलीप लिलाराम नाथानी (रा. शहादा), सुनील नथ्थूमल चांॅदवाणी (रा. कुमार नगर, धुळे), संतोष पंडित सोनवणे (रा. हायवे दर्शन कॉलनी) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख २० हजार २३० रुपयांसह जुगाराचा एकूण ९१ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात अाला अाहे. अाराेपींविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...