आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभाेलकर हत्या तपासासाठी ‘निषेध जागर’, राष्ट्रपतींना पाठवणार पत्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला वर्षभराचा, तर पानसरे दांपत्यावरील हल्ल्याला सात महिन्यांचा कालावधी उलटूनही पोलिस तपासात प्रगती नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘निषेध जागर’ करण्यात आला.

या ‘निषेध जागर’मध्ये डॉ.प्रदीप जोशी, प्रा.डी.एस.कट्यारे, विश्वजित चौधरी, हेमंत सोनवणे, पुष्पा इंगळे, विजय लुल्हे आदींसह एस.एफ.आय, सिटू आणि वर्धिष्णू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात एका समाजसुधारकाच्या खुनाच्या तपासात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरल्याबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

चौदा महिन्यांपूर्वी हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. डाॅ.दाभोलकरांच्या खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची बदली झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वत: सीबीआयप्रमुखांशी संपर्क साधून तपासातील धरसोडवृत्ती टाळण्याचे प्रयत्न करावेत. धर्माच्या नावावर विद्वेष पसरवणाऱ्या आणि डाॅ.दाभोलकरांची बदनामी करणाऱ्या संस्था-संघटनांविषयी ठोस भूमिका घेऊन कार्यवाही करून मारेकऱ्यांना पकडण्यात यावे, अशी मागणी केली.

राष्ट्रपतींना पाठवणार पत्रे
डाॅ.दाभोलकरयांचा खून करणारे पानसरे दांपत्यावर हल्ला करणाऱ्यांना पकडून कारवाई करण्याची मागणी करणारी आठ हजार पत्रे राष्ट्रपतींना पाठवण्यात येतील, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव प्रा.डी.एस.कट्यारे यांनी सांगितले.