आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांनी मनपाचा केला पंचनामा, स्वीय सहायक संजय अग्रवाल यांनी दिली घटनेची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - अायुक्त डाॅ. नामदेव भाेसले यांची काेंडी करण्यासाठी थेट महासभेत घुसलेल्या जमावाने अायुक्तांना धक्काबुक्की मारहाण केली. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्याच्या तिघा अधिकाऱ्यांनी सभागृहासह जिन्याचीही बारीकसारीक माहिती घेतली.
गुुरुवारी महापालिकेत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी अशा चार जणांच्या पथकाने या घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. त्याचप्रमाणे त्याची पाहणीही केली. सुरुवातीला पोलिसांनी महापालिकेच्या सभागृहाची पाहणी केली. पाहणीप्रसंगी आयुक्तांच्या दालनातील कार्यालयीन कर्मचारी संजय अग्रवाल यांनी पोलिसांना सर्व घटनेची माहिती दिली. तसेच सभागृहात काय घडले, कुठे घडले हेही सांगितले. पोलिसांनी सभागृहाची पाहणी करताना सभागृहाचा अंदाज घेत त्याची लांबी, रुंदीचा अंदाज घेतला. तर बैठक व्यवस्था कशा पद्धतीची आहे. त्यानंतर आयुक्त कुठे बसले होते, याची माहिती घेतली. तर सभागृहातून आयुक्त जिन्याने खाली उतरताना काय घडले, जिन्याची स्थिती कशी आहे, हेही जिन्यातून खाली उतरताना त्यांनी जाणून घेतले. तेथून आयुक्तांच्या दालनातही पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहणी केली. तेथे घडलेल्या घटनेची माहिती घेतली. या सर्व घटनेचा पंचनामा पाेलिसांनी केला आहे. महापालिकेत फिरून पोलिसांनी माहिती घेतली आहे. सभागृह, जिना, महापालिका आवार आयुक्तांच्या दालनातील सर्व प्रकाराची माहिती घेतली.

यांनी केला पंचनामा
महापालिकेतील घटनेच्या ठिकाणी येऊन त्याचा पंचनामा केला आहे. या वेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पी. डी. पाटील, किरण बर्गे, योगिता ठाकरे पोलिस कर्मचारी अशा चार जणांनी हा पंचनामा केला आहे.