आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाेलिसांची जुनी घरे भुईसपाट; चारशे सदनिकांचे नव्याने काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील पाेलिस काॅलन्यांमधील जुनी काैलारू घरे भुईसपाट केली जात अाहेत. तेथे अाता पाॅश सदनिका अाकार घेणार अाहेत. शहरात पाेलिस मुख्यालयात तब्बल चारशे सदनिकांचे काम केले जाणार अाहे. त्यासाठी काैलारू घरे पाडली जात अाहेत. पाेलिस हाउसिंग संस्थेकडे हे काम अाल्यामुळे अाता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीचीही गरज नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जमीन सपाटीकरण अाणि निविदेनंतर नवी घरे उभारली जातील. त्यामुळे पाेलिसांना नव्या सदनिका मिळतील. त्यातही विशेष बाब म्हणजे पाेलिस सदनिकांच्या चटईक्षेत्रात वाढ झाली अाहे. त्यामुळे पाेलिसांना वनएेवजी टू बीएचके घरे मिळतील.
समाजाच्या संरक्षणाचे काम करणाऱ्या पाेलिसांना वेतनातून निवासस्थान उभारणे शक्य हाेत नाही. त्यामुळे किमान नाेकरीच्या काळात हक्काचे घर असावे, घराची कुटंुबातील सदस्यांची िचंता नसावी यासाठी पाेलिसांना हक्काची घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याचा पहिला लाभ नाशिक जिल्ह्याला मिळाला. त्यात धुळे पाेलिसांकडूनही प्रस्ताव पाठवण्यात अाला. सध्या शहरातील पाेलिस काॅलन्यांमध्ये असलेली निवासस्थाने बांधून शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला अाहे. त्यामुळे या घरांची दयनीय अवस्था झाली अाहे.
हाउसिंग साेसायटी करणार काम
नव्याने हाेणाऱ्या सदनिकांचे बांधकाम हे पाेलिस हाउसिंग साेसायटीच्या माध्यमातून केले जाणार अाहे. पूर्वी शासकीय इमारतीचे काम, देखभाल करण्याची जबाबदारी ही बांधकाम विभागाकडे हाेती. मात्र, अाता केवळ पाेलिस चाैकी, अाऊटपाेस्टच्या देखभालीची जबाबदारी बांधकाम विभागाकडे अाहे. तर प्रत्येक विभागात विशेष पाेलिस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस हाउसिंग साेसायटी कार्यरत केली गेली अाहे. या साेसायटीच्या माध्यमातून पाेलिस मुख्यालयात हाेणाऱ्या सदनिकेचे काम केले जाणार अाहे. त्यामुळे या कामाचा दर्जा टिकून राहणार अाहे. नाशिकनंतर राज्यात इतक्या माेठ्या संख्येने धुळ्यातील पाेलिसांसाठी सदनिका बांधकामाला मंजुरी मिळाली अाहे.

अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र सदनिका
पाेलिसकर्मचाऱ्यां प्रमाणेच साक्री राेडवरील कुमारनगर परिसरात असलेल्या पश्चिम देवपूर पाेलिस ठाणे भागातील पाेलिसांसाठी स्वतंत्र ७० सदनिका असणार अाहेत. या कामालाही मंजुरी प्राप्त झाली अाहे. त्या ठिकाणी असलेल्या जुन्या पाेलिस लाइनच्या जागेत ह्या सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार अाहे. प्रथम कर्मचाऱ्यांच्या सदनिकांचे काम करून नंतर अधिकाऱ्यांच्या सदनिकेच्या कामाला सुरुवात हाेणार अाहे. त्या ठिकाणी वर्ग एक दाेन अधिकाऱ्यांसाठी सदनिका असणार अाहेत. पाेलिस दलातील ९४५ पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता दिला जात असल्याने त्याचा भार शासनाला सहन करावा लागणार अाहे. नवीन सदनिकेमुळे घरभाड्यापाेटी जाणाऱ्या महसुलाची रक्कम वाचणार अाहे.
जुनी घरे जेसीबीद्वारे जमीनदोस्त करताना कर्मचारी.

११६ वर्षे जुनी घरे
इंग्रजांच्या काळात ४४ पाेलिस लाइन बांधल्या. या कामाला ११६ वर्षे झाल्याने ती कालबाह्य झाली. त्या ठिकाणी पाचशे घरांची साेय हाेती. मात्र, शंभर वर्षांपूर्वीचे बांधकाम जीर्ण झाले. या ठिकाणी सद्य:स्थितीत केवळ ७५ घरांमध्ये पाेलिस राहतात. सध्या वन बीएचके पद्धतीच्या सदनिकेमध्ये अडचणी येतात.

चटईक्षेत्रात वाढीचा हाेणार फायदा
गेल्या महिन्यात घेण्यात अालेल्या निर्णयानुसार कर्मचारी, अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या घराच्या चटईक्षेत्रात वाढ केली गेली अाहे. त्यानुसार अाता कर्मचाऱ्यांना साडेतीनशे ते चारशे अाणि अधिकाऱ्यांना साडेचारशे ते साडेपाचशे चाैरस मीटर म्हणजेच टू बीएचके अाणि थ्री बीएचके सदनिका मिळणार अाहेत. मात्र, नव्याने उभारल्या जाणाऱ्या सदनिकांच्या इमारती ह्या तीन की चार मजली असतील. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
बातम्या आणखी आहेत...