आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना पाहून पाटील किचनखाली लपला, बडतर्फ पोलिस कर्मचा-याची पुण्याला रवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगावातील बडतर्फ पोलिस कर्मचारी सोपान भिका पाटील याला बुधवारी दुपारी वाजेच्या सुमारास पुणे गुन्हे विभागाच्या पोलिसांनी जळगावातून ताब्यात घेतले. पाटील याच्यावर बनावट शासकीय दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी पुण्याच्या निगडी पोलिस ठाण्यात जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे पाेलिसांच्या पथकाला पाहून साेपान पाटील हा किचन अाेट्याखाली लपून बसला हाेता.

निगडी येथील फिनोटेक्स कंपनीत काम करणाऱ्या रवींद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. सोपान पाटील याने वाशिम, यवतमाळ, वर्धा, सोलापूर, सिंधुदुर्ग येथील न्यायालयाचे बनावट वॉरंट तयार करून रवींद्र पाटील यांच्यासह पुण्यातील १० पोलिस ठाण्यांमध्ये पाठवले होते. त्यामुळे रवींद्र पाटील यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे त्यांनी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. सोपान पाटील याने पाठवलेले एक वॉरंट पुण्याच्या गुन्हे विभागाच्या जॉइंट सीपी कार्यालयात पोहोचले होते. त्यानुसार बुधवारी तेथील सहायक पोलिस निरीक्षक नितीन भोयर, डी.आर.चव्हाण, राजू मोरे, अर्जुन भांबोरे आणि गणेश काळे यांच्या पथकाने जळगावात येऊन सोपान पाटील याला त्याच्या गणेश कॉलनीतील घरातून ताब्यात घेतले.

जळगाव पोस्टाच्या शिक्क्यामुळे संशय-
सोपानपाटील याने सिंधुदुर्ग, यवतमाळ आदी जिल्ह्यांच्या न्यायालयांचे बनावट वॉरंट तयार केले होते. मात्र, ते सर्व वॉरंट जळगावच्या पोस्टाने पुण्याला पाठवले. इतर जिल्ह्यांतील वॉरंट जळगावातून कसे आले? याचा शोध घेत असताना पुणे पोलिसांनी फिर्यादींशी चर्चा केली. त्यावरून सोपान पाटील याच्यावर संशय बळावला. अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

घरात आढळली बेडी
पोलिसांनीपाटील याच्या घराची झडती घेतली असता, घरात पोलिस आरोपींच्या हातात घालतात, तशी एक बेडी आढळल्याचा खळबळजनक प्रकार समाेर अाला आहे. याशिवाय बनावट स्टॅम्प, पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या नावाने काही जणांना पत्र पाठवण्याच्या तयारीचे अनेक कागदपत्रेही मिळून आली आहेत.

तीन महिन्यांपूर्वीच शिक्षा
अशाचएका प्रकरणात सोपान पाटील यास जळगाव जिल्हा न्यायालयाने एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षेचा दंड भरून ताे सध्या जामिनावर मुक्त आहेत. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा असा प्रकार केल्याचा संशय पोलिसांना आहे.

घरात संशयास्पद कागदपत्रे
पुण्याच्यापथकाने सोपान पाटील याच्या घरात प्रवेश करताच, पाटील किचन ओट्याच्या खाली जाऊन लपला होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. यात काही बनावट शासकीय कागदपत्रे आढळून आले आहेत. ती पोलिसांनी जप्त केली आहेत.

क्रीमिनॉलॉजिस्ट असल्याचा दावा, अन् त्रास
सोपानपाटील हा क्रीमिनॉलॉजिस्ट असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करतात, असा दावा करताे. निगडीच्या रवींद्र पाटील यांचे पत्नीशी कौटंुबिक वाद आहेत. त्यांच्या पत्नी जळगावातील असून या प्रकरणात सोपान पाटील याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ते शक्य झाल्यामुळे सोपान पाटील याने रवींद्र पाटील यांना मानसिक त्रास देण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे तपासाधिकारी भोयर यांनी सांगितले.