आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोरीचा माल; झाडाच्या कुंडीत अन्‌ फरशीखाली, खाक्या दाखवताच चोरीचा उलगडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मकरापार्क येथील एका घरात डल्ला मारलेल्या दोन चोरट्यांच्या घरातून शनिवारी पोलिसांनी दागदागिने जप्त केले. सुमारे दिड महिना हुलकावणी देणारे हे चोरटे शहरातीलच असून यापैकी एकाने झाडाच्या कुंडीत तर दुसऱ्याने घरातील फरशीखाली दडवून ठेवला होता. चोरट्यांनी दागदागिने विकले नसल्याने त्यांचा माग लागत नव्हता. संशयिताला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या साथीदाराचे नाव सांगितले आणि या चोरीचा उलगडा झाला.
आसाेदा रस्त्यावरील माेहन टाॅकीजच्या मागच्या बाजूला असलेल्या विठ्ठलनगरातील मकरा पार्कमधील ब्लाॅक नंबर ३मध्ये नारायण देवराम साेनार (वय ६८) हे त्यांच्या कुटुंबीयांसाेबत राहतात. जून राेजी सर्व कुटुंबीय गच्चीवर झाेपायला गेले हाेतेे. रात्रीच्या सुमारास चाेरट्यांनी घराचा कडी-काेयंडा ताेडून ७७ हजार ८८७ रुपयांचा एेवज लंपास केला हाेता.

चाेरी झाल्यानंतर पाेेलिसांच्या श्वानाने चाेरट्यांचा मार्ग कांचननगरपर्यंत दाखवला हाेता. त्यामुळे शनिपेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी सहायक पाेलिस निरीक्षक सचिन बेंद्रे, प्राची राजूरकर, जितेंद्र साेनवणे, सिद्धार्थ बैसाणे, अमित बाविस्कर, गणेश गव्हाळे, साेमेश गरड, नरेंद्र ठाकरे, विनाेद मराठे यांच्या पथकाला तपासासाठी पाठवले हाेते. मात्र, चाेरी केलेेले दागिने विकण्यासाठी काढलेच नव्हते. त्यामुळे त्यांचा शाेध लागणे कठीण झाले हाेते. पाेलिसांना एका चाेरट्यावर संशय हाेता. त्यावरून शनिवारी ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर (वय ३५, रा. कांचननगर) याला पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चाैकशी केली असता त्याने हितेश शिवाजी परदेशी (वय २३, रा. कांचननगर) याच्यासाेबत चाेरी केल्याची कबुली दिली.

...अशीकेली चाेरी
कांचननगरातीलसेंट्रिंगचे काम करणारा ज्ञानेश्वर याने हितेश याला जून राेजी वाजता कंपनीत जायचे असल्याचे सांगून फाेन केला. हितेश हा फुले मार्केटमधील एका दुकानात सेल्समनचे काम करताे. ज्ञानेश्वरने फाेन केल्यानंतर ते रात्री वाजेपर्यंत फिरले. माेहन टाॅकीजच्या भिंतीला लागून असलेल्या बंद घरामध्ये चाेरी करण्याचे त्यांनी ठरवले. त्यानंतर ज्ञानेश्वर माेहन टाॅकीजच्या भिंतीवरून साेनार यांच्या कंपाऊंडमध्ये उडी मारली. त्या वेळी हितेश पहारा देण्यासाठी बाहेरच उभा हाेता. साेनार यांच्या घराला कुलूप असल्याचे बघून घर बंद असल्याचे त्याला वाटले. त्याने काेयंडा ताेडून घरातील सर्व ७७ हजार ८८७ रुपयांचे दागिने लंपास केले. घराजवळ जाऊन दाेघांनी चाेरीचा एेवज वाटून घेतला. चाेरी केलेले दागिने दाेन्ही चाेरट्यांनी घरातच लपवून ठेवले. त्यात हितेश याने काेणालाही शंका येऊ नये म्हणून घरात असलेल्या कुंडीतील मातीत दागिने दडवून ठेवले. तर ज्ञानेश्वर याने घरातील फरशी काढून त्या खाली दागिने ठेवून पुन्हा जशीच्या तशी फरशी ठेवून दिली होती.
जूनला दाेन चाेऱ्या
माेहनटाॅकीजच्या मागे जूनला चाेरी झाली हाेती. त्याच दिवशी एसएमअायटी काॅलेज रस्त्यावरील गुड्डुराजानगरातील प्लाॅट क्रमांक १७९ मध्ये बांधकाम व्यावसायिक गाेरखनाथ काशिनाथ वाणी यांच्या घरातही चाेरी झाली हाेती. चाेरट्यांनी घरातून २० हजार रुपये लांबवले हाेते. ही चाेरीही ज्ञानेश्वर हितेश यांनी केल्याचा संशय होता.
बातम्या आणखी आहेत...