आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Gets Help Of Whats App For The Investigation

व्हॉट्सअॅप करतेय फैजपूर पोलिसांसाठी खबऱ्याचे काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फैजपूर​- सोशलनेटवर्किंग साइटमुळे अफवांचे पीक झपाट्याने पसरते, अशी ओरड नवीन नाही. काही सोशल साइट्सवरून प्रसारित झालेल्या आक्षेपार्ह पोस्ट धार्मिक तेढ, वादाच्या कारण ठरल्या आहेत. यामुळे व्हॉट्सअॅप, फेसबुक वा अन्य माध्यमांतून देवाण-घेवाण होणारी माहिती, संदेशांवर पोलिस यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून असते. फैजपूरचे सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी व्हॉट्सअॅपचा वापर गुन्हेगारी रोखण्यासाठी गुप्त माहिती देणारा ‘खबऱ्या’ म्हणून सुरू केला आहे. त्यात त्यांना यशही मिळत आहे.

शहरात इतर जिल्ह्यांतून अथवा राज्यातून येणाऱ्या व्हाॅट्सअॅप मेसेजची शहानिशा नागरिक आता जातीने करू लागले आहेत. जातीय तेढ, आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावर, फाॅरवर्ड केल्यावर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याचे भान फैजपूर पोलिसांनी तरुणाईला व्हॉट्सअॅपवरील एका संदेशावरून करून दिल्याचे हे परिणाम आहेत. सोबतच एखाद्या सोशल नेटवर्कचा फायदा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी करता येऊ शकतो, हे फैजपूर पोलिसांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. शिवाय परिसरातील अनेक तरुण या माध्यमातून पोलिसांसोबत जुळल्याने पोलिस आणि सर्वसामान्यांमधील वाढलेली दरी कमी होण्यास मदत होईल. या सर्व बाबींचा अप्रत्यक्षपणे पोलिसांना फायदाच होऊन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे सोपे होत आहे.

अपडेट माहिती पुरवणारी स्वतंत्र यंत्रणा
कोणत्याहीक्षेत्रातील िबत्तंबातमी, आतील घडामोडी पोलिसांपर्यंत पोहोचवणारी खबऱ्यांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. गुन्हेगारांचा माग काढणे, गुन्हेगारी घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांना याचा उपयोग होतो. सहायक निरीक्षक किरण शिंदे यांनी व्हॉट्सअॅपचा वापरही खबऱ्यासारखाच केला आहे.

दीड लाखाचा गुटखा केला जप्त
शिंदेयांनी व्हाॅट्सअॅपवर टाकलेल्या संदेशामुळे २० जून रोजी त्यांना शहरात एका ठिकाणी गुटखा दडवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. व्हाॅट्सअॅपवरून मिळालेल्या या माहितीची खातरजमा केल्यानंतर झालेल्या कारवाईत तब्बल लाख ४३ हजारांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला होता. सोशल साइट्सच्या माध्यमातून प्राप्त माहितीनुसार झालेली ही विभागातील पहिलीच कारवाई ठरली आहे.

चांगला प्रतिसाद मिळतो
व्हाॅट्सअॅपमेसेजद्वारे कायदा सुव्यवस्थेसह समाजातील विविध प्रकाराची माहिती आमच्यापर्यंत पोहोचू लागली आहे. शहरासह परिसरात वापरात असलेले व्हाॅट्सअॅप ग्रुप एकप्रकारे शांततेला पाठबळ देणारे ठरत आहेत. किरण शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक, फैजपूर