आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस पतीचा शिक्षिका पत्नीवर विषप्रयोगाचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातीलएका इंग्रजी शाळेत शिक्षिका असलेल्या माधुरी वाडीले यांना धुळे एमआयडीसी परिसरात नेऊन पोलिस असलेल्या पतीने विषप्रयोग केला, या शयाच्या तक्रारीवरून नंदुरबार पोलिस दलात असलेले माधुरी वाडीले यांचे पती देवेंद्र वाडीले यांच्यासह पाच जणांविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात माधुरी देवेंद्र वाडीले (२६, रा.गं.न.५, मिरच्या मारुती चौक, धुळे) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार माहेरून दोन लाख रुपये आणावे यासाठी तिचा छळ करण्यात येत होता. मोहाडी जवळ असलेल्या हॉटेल रेसिडेन्सीजवळ माधुरी वाडीले यांना भेटण्यासाठी बोलावण्यात आले होते. या ठिकाणी एका पांढ- रंगाच्या कारमधून पती देवेंद्र चुनीलाल वाडीले, भूषण बळीराम लाड, वैशाली भूषण लाड, सरला चुनीलाल वाडीले, नीलेश चुनीलाल वाडीले हे आले. कारमधून आपल्याला त्यांनी सोबत एमआयडीसी तलावापर्यंत नेले. या ठिकाणी पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. माधुरीने नकार दिल्यामुळे इतरांनी तिचे हातपाय बांधले. तसेच पती देवेंद्र याने इतरांच्या मदतीने विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार माधुरी वाडीले यांनी दिली आहे. त्यावरून मोहाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, देवेंद्र तळोदा पेलिस ठाण्यात तर माधुरी या साक्रीरोडवरील एका इंग्रजी शाळेत कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रकरणाचा तपास झाला सुरू
याप्रकरणीठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मोहाडी पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल देवंेद्रसह पाच जणांवर गुन्हा करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विकास थोरात, उपनिरीक्षक गोकूळ पाटील, नरेंद्र कुलकर्णी, प्रशांत चौधरी, प्रभाकर बैसाणे, किशोर खैरनार, बापू कोकणी, संदीप खैरनार, भरत चव्हाण, महंमद मोबीन आदी या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती मोहाडी पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

नोंदीविषयी संभ्रम
मोहाडीपोलिस ठाण्यात सोमवारी दुपारी दोन वाजता हा गुन्हा (८८/२०१५) दाखल झाला. या तक्रारीत विषप्रयोगाची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडल्याचे नमूद आहे. तर जिल्हा रुग्णालयातील नोंदीनुसार रविवारी सायंकाळी सहा वाजता हा प्रकार घडल्याची नोंद संभ्रम निर्माण करते. शिवाय रुग्णालयात कार ऐवजी रिक्षा विषप्रयोग अज्ञात व्यक्तींनी केल्याचा उल्लेख आहे.