आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरपूरचे पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशींच्या मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरपूर - येथील शिरपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांचा मोठा मुलगा निखिल याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. निखिल सूर्यवंशी (वय २५) हा दिल्ली येथून रेल्वेने घरी येत होता. त्या वेळी बऱ्हाणपूर रेल्वेस्थानकाजवळ ५४१ क्रमांकाच्या खांबाजवळ त्याचा मृतदेह पडला होता. या घटनेचे वृत्त बुधवारी सकाळी ११ वाजता समजले.

निखिलचे आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो यूपीएससीच्या अभ्यासासाठी दिल्ली येथे गेला होता. त्या ठिकाणी त्याने क्लासेस लावले होते. गेल्या दोन वर्षांपासून तो दिल्लीतच होता. निखिल याच्यावर अमळनेर तालुक्यातील कलाली येथे गुरुवारी सकाळी वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...