आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीवायएसपींच्या पुढाकाराने पोलिस दरबाराचे आयोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फैजपूर - प्रशासनासोबत काम करताना पोलिस पाटलांसह, पोलिस अधिकारी कर्मचा-यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्या चर्चेतून सोडवण्यासह आगामी ग्रामपंचायत निवडणुकांबाबत आवश्यक सूचना देण्यासाठी, फैजपूरचे डीवायएसपी योगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने, शनिवारी (दि.११) फैजपूर पोलिस ठाण्यात पोलिस दरबार घेण्यात आला.

पोलिस दरबारात येथील पोलिस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. परिसरातील पोलिस पाटलांसह पोलिस अधिकारी, कर्मचा-यांनीदेखील कामकाजातील समस्या मोकळेपणाने मांडल्या. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही ग्रामपंचायतींची निवडणूक लवकरच होणार आहे. गावातील संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना डीवायएसपींनी केल्या. आपल्याला संशयास्पद वाटणा-या हालचालींसह, गावांमधील बारीकसारीक बाबींची माहिती तत्काळ पोलिस प्रशासनाला कळवाव्या. निवडणुकांच्या काळात खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. रमजानसह गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवावी अन् प्रतिबंधात्मक कारवाईकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले. पोलिस दरबारात उपस्थित प्रत्येकाला डीवायएसपींनी कर्तव्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. पोलिस कर्मचारी पोलिस पाटलांनी मांडलेल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे, उपनिरीक्षक मनोहर मोरे, उपनिरीक्षक संजय पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

अधिकारी, कर्मचा-यांचा पोलिस दरबार घेऊन दैनंदिन कामकाजात येणा-या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आहे. कर्मचा-यांच्या अपेक्षा अडचणींची नोंद घेतली आहे. या समस्या प्रशासकीय पातळीवर सोडवण्यावर भर दिला जात आहे. पोलिस पाटलांनाही उपक्रमाद्वारे मार्गदर्शन केले जात आहे, कामकाजाबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत. योगेशचव्हाण, डीवायएसपी, फैजपूर

पोलिस दरबाराच्या माध्यमातून अधिकारी कर्मचा-यांना आपल्या समस्या मांडता येतात. त्यामुळे तणावात असणा-या कर्मचा-यांचे मानसिक समाधान होते. या उपक्रमामुळे पोलिस कर्मचा-यांना तणावातून मुक्ती मिळण्यास मदत होते. किरणशिंदे, सहायक पोलिस निरीक्षक, फैजपूर

उपक्रमाचे केले स्वागत
पोलिसांनाकर्तव्य बजावताना प्रचंड तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे कर्मचा-यांच्या समस्या जाणून घेत त्यांना दिलासा देण्याचे, महत्त्वपूर्ण कार्य पोलिस दरबाराच्या माध्यमातून होणार आहे.

कायदा-सुव्यवस्थेस बळकटी
पोलिसठाण्यातील पोलिस दरबारामुळे पोलिस पाटलांच्या कामात अधिक गतिमानता येईल. ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिस पाटलांना, यामुळे अधिका-यांचे मार्गदर्शन मिळते. मार्गदर्शनामुळे कायदा सुव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल, असा सूर पोलिस पाटलांमधून व्यक्त झाला.

पोलिसांना अल्प घरभाडे
पोलिसकर्मचा-यांसाठी पोलिस वसाहत नसल्याची समस्या पोलिस दरबारात पुढे आली. तसेच घरभाडेदेखील अल्प स्वरुपाचे मिळत असल्याचीही कर्मचा-यांनी तक्रार केली. अल्प घरभाड्यात फैजपूरसारख्या शहरात घर मिळत नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला.
पोलिस दरबारात उपस्थित पोलिस पाटलांच्या समस्या जाणून घेताना फैजपूरचे डीवायएसपी योगेश चव्हाण.

अधिका-यांनी केले मार्गदर्शन
कर्तव्यबजावताना पोलिसांनी कार्यालय आणि घर यांची सरमिसळ करू नये. कर्मचा-यांना कौटुंबिक किंवा कार्यालयीन समस्या असल्यास तत्काळ वरिष्ठांशी चर्चा करून तणावातून मुक्त व्हावे, अशी सूचना डीवायएसपी योगेश चव्हाण यांनी कार्यक्रमात बोलताना केली.
बातम्या आणखी आहेत...