आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेशल मीडियावर पोलिसांची नजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नाशिकला साेशल मीडियावरून पसरवण्यात अालेल्या संदेश अफवांमुळे जातीय तणाव निर्माण हाेऊन दंगल झाली हाेती. असे प्रकार घडू नये, यासाठी पाेलिसांनी अाता कठाेर पावले उचलली अाहे. व्हाॅट्सअॅप, फेसबुकसारख्या साेशल मीडियावरून चुकीचा संदेश पसरवणाऱ्यांवर पाेलिस अाता सायबर पेट्राेलिंगच्या माध्यमातून नजर ठेवणार असल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर साेमवारी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक परीक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक व्ही. के. चाैबे साेमवारी शहरात अाले हाेते. त्यांनी सकाळी ११ ते दुपारी वाजेदरम्यान पाेलिस अधीक्षक कार्यालयात कायदा सुव्यवस्थेबाबत अाढावा बैठक घेतली. यात त्यांनी जळगाव जिल्ह्यातील जातीय तणावाच्या घटनांचा अाढावा घेतला. साेशल मीडियावरून पसरवलेल्या अफवांमुळे जातीय तणाव निर्माण हाेतात, यासाठी अशा सायबर पेट्राेलिंगच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात अाले. तसेच तणाव पसरवणारे हाेर्डिंग्ज, बॅनर्स, पाेस्टर्स यांच्यावर कारवाई करून त्याचा अहवाल दिवसांच्या अात पाेलिस अधीक्षकांना सादर करण्याचे अादेश दिले. अागामी नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिस्ट्रीशिटर्सची यादी तयार करावी. त्यांच्यावर कारवाई करून २० दिवसांच्या अात अहवाल सादर करण्याचे अादेश दिले. ग्रामीण भागात असणाऱ्या पुतळ्याच्या रक्षणासाठी पुतळा संरक्षण समिती स्थापन करण्याचेही चाैबे यांनी सांगितले. बैठकीला जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर, अपर पाेलिस अधीक्षक माेक्षदा पाटील, नंदकुमार ठाकूर, सर्व उपविभागीय पाेलिस अधिकारी जळगाव विभागातील पाेलिस ठाण्यांचे प्रभारी उपस्थित हाेते.

पाेलिस पाल्यांसाठी नाेकरीविषयक मार्गदर्शन
पाेलिस कल्याण निधी विभागाच्या माध्यमातून पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी नाेकरीविषयक मार्गदर्शनासाठी पाेलिस अधीक्षक कार्यालयात एक विभाग सुरू करण्यात येणार अाहे. त्यात सरकारी खासगी क्षेत्रातील नाेकरी संधीच्या संदर्भात मार्गदर्शन दिले जाणार अाहे. ४० वर्षांवरील अधिकारी अाणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार अाहे.

अाढावा बैठक झाल्यानंतर नाशिकला जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर दाखल झालेले महानिरीक्षक चाैबे.
बातम्या आणखी आहेत...