आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेरात खासगी लक्झरी चालकांना पोलिसांची नोटीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर - खासगी लक्झरी बसचालकांना अमळनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामदास पाटील यांनी नोटीस बजावली असून त्यांनी 1 जानेवारीपासून शहरात प्रवेश करू नये, याबाबत दक्षता घेण्याची सूचना केली आहे.

या अगोदर प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, आमदार साहेबराव पाटील, तसेच संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांच्या समवेत झालेल्या बैठकीत अमळनेरातील वाहतूक सुरक्षित रहावी, यासाठी लक्झरींना थांबा नियोजित केलेला होता. मात्र, तरीही यापुढे सायंकाळी सहा ते नऊ वाजेदरम्यान उपलब्ध जागेवरच बसेस उभ्या कराव्या. यापुढे बसेस शहरात पार्किंग करू नये. आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी सूचना केलेली आहे.

शेतकी संघाच्या मैदानावर तयारी
नववर्षात शेतकी संघाच्या मैदानावर लक्झरी थांबा सुरू होईल. यासाठी शेतकी संघाच्या मैदानावर तयारी झाली आहे. 1 जानेवारीपासून हा थांबा कार्यान्वित होईल.

जानेवारीपासून शहरात पालिकेच्या रस्त्यावर एकही खासगी लक्झरी बसेस दिसणार नाही. याबाबत लक्झरीचालकांनी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत मागितलेली आहे. शहरात लक्झरी बसेस अवैधरित्या थांबलेली दिसल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचे सत्र सुरू करण्यात येईल. रामदास पाटील, पोलिस निरीक्षक, अमळनेर

लक्झरीचालकांनी सांगितलेलेच भाडे शेतकी संघाने मान्य केले आहे. मात्र, तरीही ते का येत नाही याचे कोडे, उलगडत नाही, यासाठी मैदानावर तयारी केली आहे. ते येणे न येणे आमचा संबंध नाही. प्रांताधिकार्‍यांसमोर त्यांनी ही बाब मान्य केली आहे. 100 रुपये देणे त्यांना काहीच जास्त नाही. या मैदानाचा वापर लक्झरीचालकांनी केल्यास संघाला भाडे मिळेल, एवढेच आहे. गोकूळ बोरसे, चेअरमन, शेतकी संघ.

आम्ही सेवाक्षेत्रात काम करतो, त्यापोटी पैसै घेतो. मात्र त्याठिकाणी प्रवाशांना सुविधा मिळाल्या नाहीत तर आमच्या गाड्या कशा चालतील. यासाठी आम्हाला सुविधा द्यावी. 70 टक्के ग्राहक हे ग्रामीण भागातून येतात. प्रवासी निवारा तसेच परिसरात कार्यालये उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचललेले नाही. अजय केले, ट्रॅव्हल्स मालक.