आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोखीम पत्कारून बेवारस बॅग पोलिसांनी उघडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातीलनटवर मल्टिप्लेक्सच्या आवारात एका दुचाकी(अॅक्टिवा)वर बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास बेवारस स्थितीत एक बॅग आढळून आली. शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी या बॅगची बॉम्बशोधक नाशक (बीडीडीएस ) पथकाकडून तपासणी करताच ताब्यात घेऊन स्वत:च उघडली. पंजाब येथील घटनेनंतर देशभरात सतर्कतेचे आदेश असतानाही पोलिसांनी ही गंभीर चूक केली; तर दुसरीकडे ही बॅग चोरीची असल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिस ठाण्यात बॅग आणल्यानंतर त्यात काही पुस्तके आेळखपत्र आढळून आले. लीलाधर पाटील नामक व्यक्तीची ही बॅग होती. ओळखपत्रावर असलेल्या मोबाइल क्रमांकावरून पोलिसांनी पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आपली सुटकेस सकाळी बसस्थानक परिसरातून चोरीस गेली असल्याची माहिती दिली. मात्र, पोलिसांनी यासंदर्भात गुप्तता कमालीची पाळली होती. सुटकेस पाटील यांच्याकडूनच नजरचुकीने राहून गेली, अशी माहिती पािलसांनी माध्यमांना दिली. तसेच या घटनेबाबत अधिक माहिती देण्यासही टाळाटाळ करण्यात येत होती. आधीच चोरीच्या घटना थांबत नाहीत. त्यात आणखी एक बॅग चोरी झाली. कदाचित याच भीतीने पोलिसांनी ही घटना दाबण्याचा प्रयत्न करीत, मोठी जोखीम पत्करून स्वत:च बॅग उघडली.

तपासावर हे प्रश्न होतात निर्माण
जर बॅग बेवारस होती तर बीडीडीएस पथकाकडून तपासणी का करण्यात अाली नाही?
चोरीची होती तर पोलिस ठाण्यात नोंद का करण्यात अाली नाही?
तपासाधिकारी म्हणतात लीलाधर पाटील यांच्याकडून बॅग गहाळ झाली, तर गुन्हे शोध पथकातील कर्मचारी म्हणतात बॅग चोरीस गेली होती.
लीलाधर पाटील कुठे राहतात? हेही पोलिसांनी सांगितले नाही.
शहर पाेलीस ठाण्यात आणलेली बॅग.