आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुगार अड्ड्यावर छापा, चौघांना अटक, यावल पोलिसांच्या कारवाईमुळे उडाली खळबळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- तालुक्यातील कोळवद येथे जुगार खेळणाऱ्या चौघांना अटक करून साहित्यासह १४४० रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. शुक्रवारी सकाळी आठ वाजता यावल पोलिसांनी ही कारवाई केली.

कोळवद येथे सुभाष कमलाकर फेगडे यांच्या घराच्या मागील बाजूस जुगारअड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांना मिळाली होती. यानुसार त्यांनी उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे, अय्युब तडवी, राहूल पांचाळ, शैलेंद्र बनसोडे यांच्या पथकास शुक्रवारी सकाळी कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने आठ वाजता कोळवदमधील जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुभाष फेगडे, विशाल रवींद्र भालेराव, शशिकांत नरोत्तम धांडे आणि युनुस फकिरा तडवी या चौघांना जुगाराचे साहित्य, १४४० रूपये रोख रकमेसह ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गावात मात्र चांगलीच खळबळ उडाल्याचे चित्र होते.
बातम्या आणखी आहेत...