आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांना सापडले गुटख्याचे घबाड, बळीरामपेठेतून चार लाखांचा गुटखा जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बळीरामपेठेतील विनय राेडलाइन्स या ट्रान्सपाेर्टच्या कार्यालयात शनिपेठ पाेलिसांनी साेमवारी दुपारी १२ वाजता धाड टाकली. यात त्यांनी लाख ८४ हजारांचा गुटखा जप्त केला अाहे. कारवाईदरम्यान ट्रान्सपाेर्टच्या मालकाने पाेलिसांना गाेडाऊनची किल्ली देण्यासाठी एक तास टाळाटाळ केली. दरम्यान, पाेलिसांनी पुढील कारवाईसाठी सर्व माल अन्न अाैषध प्रशासन विभागाच्या ताब्यात दिला अाहे.

बळीरामपेठेतील ब्राह्मणसभेच्या गल्लीतील राजेंद्र मधुकर कुलकर्णी यांच्या मालकीच्या घरात विनय राजकुमार विश्वकर्मा याचे विनय राेडलाइन्स हे ट्रान्सपाेर्टचे कार्यालय अाहे. या कार्यालयात साेमवारी सकाळी बाहेरराज्यातून गुटखा, पानमसाला अाणि सुगंधी तंबाखूच्या गाेण्या अाल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांना मिळाली. त्या माहितीवरून त्यांनी शनिपेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक अात्माराम प्रधान यांना कारवाईचे अादेश दिले. त्यांनी साहाय्यक पाेलिस निरीक्षक बेंद्रे, माेतीलाल पाटील, उमाकांत चाैधरी, अनिल धांडे यांना कारवाईसाठी पाठविले. साेमवारी दुपारी १२ वाजता पाेलिसांचे पथक विनय ट्रान्सपाेर्टच्या कार्यालयात अाले. त्या वेळी तीन खाेल्या उघड्या हाेत्या, तर बाजूच्या तीन खाेल्यांना कुलूप लावलेेले हाेते. विनय ट्रान्सपाेर्टचा मालक विनय विश्वकर्मा याच्याकडे कुलपाची किल्ली मागितल्यावर त्याने घरमालकाकडे असल्याचे सांगितले. घरमालक अाल्यावर सर्व प्रकारचा उलगडा झाला. त्यांनी सर्व घरच विनय ट्रान्सपाेर्टला भाड्याने दिल्याचे सांगितले. पाेलिस कर्मचारी धांडे यांना एक किल्ल्यांचा गुच्छा पडलेला दिसला. त्यातील एका किल्लीने कुलप उघडले.

जप्त केलेला माल एफडीएच्या ताब्यात
गाेडाऊन शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने पाेलिस निरीक्षक प्रधान यांनी सर्व माल शहर पाेलिसांच्या ताब्यात दिला. त्यांनी अन्न अाैषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बाेलावून पुढील कारवाईसाठी सर्व जप्त केलेला माल ताब्यात दिला. हा सर्व माल भूषण तांबे (वय ३०, रा. शिवाजीनगर) याचा अाहे. तसे तांबे याने एफडीएच्या अधिकारी संदीप देवरे यांना सांगितले.
बळीरामपेठेतून गुटखा जप्त करताना पोलिस.

दाेन खाेल्यांमध्ये तंबाखूचा साठा
पाेलिसांनीकुलूप उघडल्यानंतर अात प्रवेश केला. दाेन खाेल्यांमध्ये गुटखा, सुगंधित तंबाखू अाणि पानमसाल्याच्या गाेण्या ठेवलेल्या हाेत्या. एक तासापासून पाेलिसांना झुलवणाऱ्या ट्रान्सपाेर्टमालकाचा पाेलिसांनी चांगलाच समाचार घेतला. दाेन खाेल्यांमधून पानमसाल्याचे २५ कार्टून अाणि सुगंधित तंबाखू, गुटख्याच्या २० गाेण्या असा एकूण लाख ८४ हजारांचा अवैध गुटखा पाेलिसांना सापडला.
बातम्या आणखी आहेत...