आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेरात पोलिसांचा कुंटणखान्यावर छापा; 4 तरुणींसह 1 महिला ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
अमळनेर: शहरातील गांधलीपुरा भागातील वेश्या वस्तीवर पोलिसांनी सोमवारी छापा मारून चार तरुणींसह एका महिलेस ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या पथकाने सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास केली. रेस्क्यू फाउंडेशन (कांदिवली, मुंबई)च्या दीपेश टाक मेहंदीया रिज्वी यांना अमळनेरात अल्पवयीन मुलींकडून अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांची भेट घेऊन तक्रार केली. याबाबत चौबे यांनी चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद पाटील, उपनिरीक्षक सुरेश मोरे, कॉन्स्टेबल संजय पाटील, अनमोल पटेल, मिलिंद भामरे, रेखा इशी, नाना चित्ते, युवराज नाईक यांच्या पथकाने सोमवारी रात्री या वस्तीवर छापा मारला. त्यानंतर 'पिटा' कायद्यांतर्गत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खबर मिळताच वस्ती खाली 
कारवाईसाठी पोलिस येत असल्याची खबर वेश्या वस्तीतील काही महिलांना अगोदरच मिळाली होती. त्यामुळे त्या घरांना कुलूप लावून गायब झाल्या होत्या. दरम्यान, या परिसरात चार तरुणी एक महिला आढळून आली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, यातील तरुणी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असल्याचे त्यांच्या पालकांच्या म्हणण्यानुसार समजत आहे. पोलिसांनी या तरुणी आणि त्या महिलेस न्या. अतुल कुलकर्णी यांच्या न्यायालयात मंगळवारी हजर केले. याप्रकरणी फक्त महिलेस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्या चौघा तरुणींचे जबाब नोंदवून घेण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...