आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सट्टा पेढ्यांवर पोलिसांचे छापे; ३४ हजारांच्या रोकडसह साहित्य जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील वैतागवाडी भागात डीवायएसपी रोहिदास पवार, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी कारवाई करण्यात आली होती. कारवाईतील ३९ वारांगणांना पोलिसांनी बुधवारी आशादीप सुधारगृहात रवाना केले, तर १३ आंबटशौकिनांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तर कुंटणखाना चालवणाऱ्या चार महिलांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ‘पिटा’ अॅक्टनुसार कारवाई केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वारांगणांच्या घराला सील लावले जाणार आहे. सील लावण्याची प्रक्रिया येत्या आठवडाभरात होण्याची शक्यता आहे. वैतागवाडी परिसरात लष्करी जवानाच्या खुनानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. कारवाईचे शहरवासीयांनी स्वागत केले आहे.

उज्जैनचासंशयित अटकेत :बाजारपेठ पोलिसांच्या गस्तीपथकाने मंगळवारी रात्री उज्जैनच्या संशयिताला पकडले. राजेश मंगुलाल परमार हा संशयित पोलिसांना पाहून पळत सुटला. त्यामुळे हवालदार राजेंद्र ताेडकर, तुषार जावळे, संजय पाटील, श्रीकृष्ण देशमुख यांनी त्याला ताब्यात घेतले. तपासणी केली असता त्याच्याकडे चाव्यांचा गुच्छा सापडला. बाजारपेठ पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध नोंद करण्यात आली.

- सट्टा पेढ्यांवरछापे : शहरातचार ठिकाणी सट्टा पेढ्यांवर बुधवारी छापे टाकले. जयराम सिंधी, मंगल तेजकर, नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी, प्रकाश उर्फ बाबू कारडा, जगदीश बुसलानी, दीपक पाटील, आरिफ तडवी, शविाजी पाटील, सुनील कांबळे, चंद्रकांत जैन, माजी नगरसेवक सलीम खान तसलीम खान, सुरेश चव्हाण यांच्यावर गुन्हे दाखल झाले. ३४ हजार ८९० रुपये जप्त करण्यात आले.

- दादागिरी खपवणारनाही :बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. लाॅजचालकांनी लाॅजवर थांबणाऱ्यांच्या ओळखपत्रांची झेराॅक्स ठेवणे बंधनकारक आहे. अन्यथा तपासणीत कारवाई केली जाईल, असे निरीक्षक नजनपाटील यांनी ‘दवि्य मराठी’शी बोलताना सांगितले.

संपूर्ण विभागात कारवाईची धडक मोहीम सुरू
भुसावळशहरासह संपूर्ण विभागात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाविरुद्ध कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. रात्री १० वाजेनंतर सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई केली जाणार आहे. व्यावसायिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. राेहिदासपवार, डीवायएसपी, भुसावळ

५०० रुपये दंड
बुधवारीडीवायएसपी पवार, पोलिस निरीक्षक नजनपाटील यांनी शहरातील लाॅजेसची अचानक तपासणी केली. स्वस्तिक लाॅज कन्हैयाकुंज लाॅजमध्ये तपासणी करण्यात आली. तपासणीत कन्हैयाकुंज लॉजमध्ये एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिस अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. अचानक झालेल्या तपासणीमुळे लाॅजचालकांची चांगलीच धावपळ उडाली. आगामी काळात शहरातील सर्व लाॅजेसची पोलिस प्रशासनातर्फे नियमित तपासणी केली जाणार आहे.
शहरात कारवाईचे सत्र
शहरातील वैतागवाडी भागात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून ४५ वारांगणांसह १३ आंबटशौकिनांवर ‘पिटा’ (स्त्रिया मुली यांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध १९५६ अधिनियम) कायद्यांतर्गत कारवाई केली होती. कारवाईतील ३९ वारांगणांना जळगाव येथील आशादीप सुधारगृहात पाठवण्यात आले. तसेच बुधवारीदेखील शहरात विविध ठिकाणी पोलिसांनी सट्ट्याच्या पेढ्यांवर छापे टाकले, तसेच लॉजेसची तपासणीही केली. यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यासह नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला. कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.