आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावण दहनासाठी पोलिस प्रशासन सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शिरसोलीरोड व मोहाडी रोड दरम्यानच्या सुमारे 25 एकर जागेवर रविवारी सायंकाळी 5.30 वाजता रावण दहन करण्यात येणार आहे. दरवर्षी मेहरुण तलावातील चौथार्‍यावर रावणदहन करण्यात येते. दहनासाठी पालिकेसह पोलिस प्रशासन सज्ज झालेले आहे.

रावण दहन पाहण्यासाठी येणार्‍या नागरिकांच्या सुरक्षा व वाहतूक नियमनासाठी सुमारे दोनशे पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहनांना दुपारी 4 वाजेपासून शिरसोली रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. तर पार्किंगसाठी मेहरुण तलावाकडे जाणारे रस्ते व रावण दहनस्थळाच्या शेजारील टेकडीवरील सिंमेटचे रस्त्यावर व्यवस्था करण्यात आली आहे.

सुरक्षानगरातही दहन
सुरक्षानगर बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे यंदाही रविवारी दसर्‍यानिमित्त सुरक्षानगरात रावण दहन करण्यात येणार आहे. राहुल सोनवणे यांच्या हस्ते रावण दहन होणार आहे. शांताराम सोनवणे, अश्विन सोनवणे, अमित सोनवणे, रमेश बनकर, पी.जे.पाटील आदी उपस्थित राहणार आहेत, असे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.