आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस भरती; एका जागेसाठी २० उमेदवार देणार लेखी परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पाेलिस भरतीसाठी झालेल्या मैदानी चाचणीत हजार २७८ उमेदवार उत्तीर्ण झाले अाहेत. त्यांची लेखी परीक्षा साेमवारी सकाळी वाजता पाेलिस कवायत मैदानावर घेतली जाणार अाहे. एकूण ६२ जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका जागेसाठी उमेदवाराचे प्रमाण सरासरी २०.६१ एवढे झाले अाहे.

पाेलिस भरतीसाठी साेमवारी सकाळी वाजता १०० गुणांची दीड तासांची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यासाठी पाेलिस कवायत मैदानावर ४० सेक्टर पाडण्यात अाले अाहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये ३२ उमेदवार बसवले जाणार अाहेत. तसेच परीक्षा बहूपर्यायी असणार असून ए, बी, सी, डी असे प्रश्नपत्रिकेचे चार सेट राहणार अाहेत. त्यासाठी पाेलिस विभागाकडून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पॅड अाणि पेन दिले जाणार अाहेत.

परिक्षेसाठी अपर पाेलिस अधीक्षक, पाेलिस उपअधीक्षक, १० पाेलिस निरीक्षक, सहायक पाेलिस निरीक्षक, २५ पाेलिस उपनिरीक्षक, १६३ कर्मचाऱ्यांचा फाैजफाटा असणार अाहे. तसेच एमपीएसीप्रमाणे उमेदवारांना उत्तरपत्रिकेची कार्बन काॅपी जागेवरच दिली जाणार अाहे. तर परीक्षा झाल्यानंतर ‘अॅन्सर की’ सार्वजनिक ठिकाणी लावली जाणार असल्याची माहिती पाेलिस उपअधीक्षक(गृह) महारू पाटील यांनी दिली.