आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वदि्यार्थिनींना मिळाली पोलिस सुरक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - बसस्थानकात वदि्यार्थिनी, तरुणींची छेड काढण्याचे प्रमाण वाढल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. याबाबत ‘दवि्य मराठी’ने २१ जूनला प्रसदि्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन बसस्थानकात पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामुळे रोडरोमिओंसह टारगटांचा बंदोबस्त करणे सोपे होईल.

गेल्या २० जूनला कोरपावली (ता.यावल) येथील एका वदि्यार्थिनीची दोन तरुणांनी छेड काढली होती. हा वृत्तांत ‘दवि्य मराठी’ने २१ जूनच्या अंकात ‘बसस्थानकात दोन तरुणांनी काढली वदि्यार्थिनीची छेड’ या मथळ्याखाली प्रसदि्ध केला होता. याची दखल घेत बसस्थानकात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून आता थेट पोलिस मदत केंद्रच तयार करण्यात आले आहे. यावल आगार व्यवस्थापन आणि पोलिसांनी यासाठी पुढाकार घेतला. पूर्वी आगारात ज्या ठिकाणी पार्सल विभागाचे कार्यालय होते, तेथेच पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. तूर्त शाळा-महावदि्यालयांच्या वेळेत येथे एका पोलिस उपनिरीक्षकासह तीन कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात येत आहे. यामुळे वदि्यार्थिनींना सुरक्षा मिळाली आहे.
^बससाठी तासखेडा येथील पालकांनी आंदोलन केले होते. आम्ही मुक्ताईनगर, भुसावळ आगाराला पत्रव्यवहार करून गाडी सुरू करावी, अशी विनंती केली आहे. मात्र, सहकार्य मिळत नाही. के.आर.महाजन,मुख्याध्यापक, ना.गो.पाटील वदि्यालय, उदळी

पोलिस मदत केंद्रासाठी आगाराने कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. वदि्यार्थिनी, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कायम पोलिस कर्मचारी ठेवणार आहोत. रत्नाकरपगारे, पोलिस उपनिरीक्षक, यावल
^बसस्थानकाच्या दर्शनी भागात असलेले पार्सल विभागाचे कार्यालय पोलिस मदत केंद्रासाठी उपलब्ध करून दिले आहे. तेथे पोलिसांची बैठक व्यवस्था करण्यात येईल. के.व्ही. महाजन, प्रभारी आगार व्यवस्थापक, यावल

वदि्यार्थिनी, तरुणींची छेड काढण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. रोडरोमिओ थेट बसस्थानकात शिरून उपद्व्याप करतात. पोलिसांनी मोहीम राबवून त्यांचा बंदोबस्त करावा. सागरदेवांग, युवा सेना शहरप्रमुख, यावल

युवा सेनेचे निवेदन
युवासेनेचे शहरप्रमुख सागर देवांग यांच्यासह मोहसीन खान, चित्तरंजन गर्गे, आकाश कोळी, योगेश सपकाळे, सागर बोरसे, शेखर नन्नवरे, अजहर शेख, गोविंदा सुतार, शेख जुनेद, रोहित सुतार आदींनी यावल पोलिसांना निवेदन देत रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.